चिंचणी-वांगी बलात्कार प्रकरणातील आरोपीला २० वर्षे सक्तमजुरी

👤 संतोष एडके तासगाव | 📅 12 August 2026 | 👁 56 Views
चिंचणी-वांगी बलात्कार प्रकरणातील आरोपीला २० वर्षे सक्तमजुरी
चिंचणी-वांगी पोलीस ठाणे हद्दीतील बलात्कार व गर्भपातास प्रवृत्त केल्याच्या गंभीर प्रकरणात आरोपी अजित विजय जाधव (वय ३२, रा. तडसर, ता. कडेगाव, जि. सांगली) याला विटा येथील तदर्थ १ जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायालयाने दोषी ठरवत २० वर्षे सक्तमजुरी आणि ५० हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली. दंड न भरल्यास सहा महिने साधा कारावास भोगावा लागणार आहे.
या प्रकरणी चिंचणी-वांगी पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक २९/२०२३ दाखल करण्यात आला होता. आरोपीने पीडितेला तलवारीने जीवे मारण्याची धमकी देऊन तिच्याशी जबरदस्तीने लैंगिक अत्याचार केल्याचा आरोप होता. तसेच पीडिता व तिची आई अंगणात झोपलेली असताना पीडितेला उचलून नेऊन तिच्यावर पुन्हा अत्याचार केल्याचे तपासात समोर आले.
पीडितेला गर्भधारणा झाल्याचे समजल्यानंतर आरोपीने गर्भपाताची औषधे पाण्यात मिसळून जबरदस्तीने पाजली तसेच गोळ्या खायला लावल्याने तिचा गर्भपात झाल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले होते.
तत्कालीन पोलीस अधीक्षक संदीप घुगे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक महादेव शिंदे व त्यांच्या पथकाने या प्रकरणाचा तपास केला. न्यायालयीन सुनावणीदरम्यान एकूण सहा साक्षीदार तपासण्यात आले. यामध्ये पीडितेची साक्ष महत्त्वाची ठरली. पीडितेची साक्ष ग्राह्य धरून न्यायालयाने आरोपीला दोषी ठरवत शिक्षा सुनावली.
सरकारी अभियोक्ता म्हणून विनायक देशपांडे यांनी काम पाहिले. प्रकरणाच्या सुनावणीदरम्यान पोलीस अधीक्षक तुषार दोशी, अपर पोलीस अधीक्षक कल्पना बारवकर आणि एलसीबीचे पोलीस निरीक्षक झाडे यांनी तपासी अधिकारी तसेच जिल्हा सरकारी अभियोक्त्यांकडून वेळोवेळी प्रकरणाचा आढावा घेत मार्गदर्शन केले.
या कामात कोर्ट पैरवी अधिकारी स.पो.नि. मुदस्सर शेख, चिंचणी-वांगी पोलीस ठाण्याचे कोर्ट ड्युटी पोलीस अंमलदार पो.हे.कॉ. एस.बी. यादव, श्रेणी पोलीस उपनिरीक्षक जितेंद्र कवठेकर, म.पो.ना. एस.एस. जाधव तसेच कोर्ट मॉनिटरिंग सेलचे श्रेणी पोलीस उपनिरीक्षक एस.एल. कलकुटगी आणि पी.जे. डांगे यांचे सहकार्य लाभले.
Weather
Stock Market
Live Cricket
LIVE
राजारामबापू साखर कारखाना विस्तारीकरण प्रस्तावावर ग्रामस्थांच्या हरकती | राजारामबापू साखर कारखाना विस्तारीकरण प्रस्तावावर ग्रामस्थांच्या हरकती | चिंचणी-वांगी बलात्कार प्रकरणातील आरोपीला २० वर्षे सक्तमजुरी | द्वेषाची फवारणी! दिघंचीत युवा शेतकऱ्याच्या उभ्या ढब्बू मिरचीवर तणनाशक मारले; १० लाखांचे पीक उद्ध्वस्त | सागरी कासव संरक्षणासह कोळंबी निर्यातीला चालना; ट्रॉलरवर TED बसविणे बंधनकारक | २० वर्षांच्या प्रतीक्षेनंतरचा रस्ता पहिल्याच पावसात उखडला! | रुग्णांच्या नातेवाईकांसाठी मुंबईत ‘आरोग्य कॉरिडॉर’ उभारण्याची -आमदार प्रमोद जठार यांची मागणी | कणकवली बाजारपेठेत जुगार अड्डयावर पोलिसांचा छापा -पाच जणांवर गुन्हा दाखल | श्री संत दामाजी महाविद्यालयात डॉ. एस. आर. रंगनाथन जयंती उत्साहात साजरी | अण्णासाहेब पाटील महामंडळाच्या ₹300 कोटी निधीचे वितरण सुरू |