मंगळवेढा : श्री विद्या विकास मंडळ संचलित श्री संत दामाजी महाविद्यालयात ग्रंथालयशास्त्राचे जनक डॉ. एस. आर. रंगनाथन यांची १३४ वी जयंती व राष्ट्रीय ग्रंथपाल दिन उत्साहात साजरा करण्यात आला. महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य प्रा. डॉ. पी. एम. होनराव यांच्या मार्गदर्शनाखाली या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.
कार्यक्रमाच्या प्रारंभी प्रभारी प्राचार्य प्रा. डॉ. पी. एम. होनराव व महाविद्यालयाचे ग्रंथपाल प्रा. नवनाथ बुरूंगले यांच्या हस्ते डॉ. एस. आर. रंगनाथन यांच्या प्रतिमेचे पूजन करून अभिवादन करण्यात आले.
डॉ. एस. आर. रंगनाथन यांनी भारतातील ग्रंथालय चळवळीला शास्त्रीय आणि आधुनिक स्वरूप देण्यासाठी महत्त्वपूर्ण योगदान दिले. त्यांच्या कार्याचे स्मरण करून विद्यार्थ्यांमध्ये वाचनाची आवड निर्माण करणे, ग्रंथालयाचा प्रभावी वापर करणे आणि ज्ञानसंपादनाची संस्कृती रुजविण्याचे महत्त्व यावेळी अधोरेखित करण्यात आले.
यावेळी महाविद्यालयाचे उपप्राचार्य प्रा. व्ही. व्ही. गुरव, पर्यवेक्षक प्रा. धनाजी गवळी, ग्रंथालय परिचर प्रसाद राजमाने यांच्यासह वरिष्ठ व कनिष्ठ विभागातील सर्व प्राध्यापक, कार्यालयीन कर्मचारी उपस्थित होते.डॉ. एस. आर. रंगनाथन यांनी भारतातील ग्रंथालय चळवळीला शास्त्रीय आणि आधुनिक स्वरूप देण्यासाठी महत्त्वपूर्ण योगदान दिले. त्यांच्या कार्याचे स्मरण करून विद्यार्थ्यांमध्ये वाचनाची आवड निर्माण करणे, ग्रंथालयाचा प्रभावी वापर करणे आणि ज्ञानसंपादनाची संस्कृती रुजविण्याचे महत्त्व यावेळी अधोरेखित करण्यात आले.
कार्यक्रमाच्या निमित्ताने महाविद्यालयातील प्राध्यापक, कर्मचारी व विद्यार्थ्यांनी डॉ. रंगनाथन यांच्या कार्याला अभिवादन केले.