रेकॉर्डवरील आरोपीकडून पिस्टलसह दोन जिवंत काडतुसे जप्त; ६२ हजारांचा मुद्देमाल हस्तगत

👤 संतोष एडके तासगाव | 📅 26 August 2026 | 👁 42 Views
रेकॉर्डवरील आरोपीकडून पिस्टलसह दोन जिवंत काडतुसे जप्त; ६२ हजारांचा मुद्देमाल हस्तगत


सांगली : स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने अवैध अग्निशस्त्र बाळगणाऱ्या रेकॉर्डवरील आरोपीला ताब्यात घेत त्याच्याकडून एक देशी बनावटीचे पिस्टल आणि दोन जिवंत काडतुसे असा एकूण ६२ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. ही कारवाई २५ ऑगस्ट रोजी रात्री जुना धामणी रोड परिसरात करण्यात आली.

मधुसुदन महेश मगदुम (वय २४, रा. गल्ली नं. ६, हसनी आश्रम, विश्रामबाग, सांगली) असे ताब्यात घेतलेल्या आरोपीचे नाव आहे.

सांगली जिल्ह्यातील गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी तसेच अवैध शस्त्रे बाळगणाऱ्या व्यक्तींवर कठोर कारवाई करण्याच्या सूचना पोलीस अधीक्षक तुषार दोशी आणि अप्पर  पोलीस अधीक्षक कल्पना बारवकर यांनी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेला दिल्या आहेत. त्यानुसार पोलीस निरीक्षक संजीव झाडे यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष मोहीम राबविण्यात येत आहे.

या मोहिमेदरम्यान स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस उपनिरीक्षक महादेव पोवार यांच्या पथकातील पोहेकॉ रणजीत जाधव  व संकेत कानडे  यांना गोपनीय बातमीदारामार्फत माहिती मिळाली की, रेकॉर्डवरील आरोपी मधुसुदन मगदुम हा जुना धामणी रोड परिसरात कमरेला पिस्टल खोचून थांबला आहे.

माहितीच्या आधारे पथकाने परिसरात निगराणी ठेवली असता संशयित इसम आढळून आला. पोलिसांनी त्याला ताब्यात घेऊन पंचांसमक्ष अंगझडती घेतली. त्यावेळी त्याच्या कमरेला पॅन्टमध्ये ६० हजार रुपये किमतीचे देशी बनावटीचे पिस्टल, तर पॅन्टच्या खिशात दोन हजार रुपये किमतीची दोन जिवंत काडतुसे आढळून आली.

अग्निशस्त्र बाळगण्याबाबत आरोपीकडे कोणताही कायदेशीर परवाना नसल्याचे समोर आले. त्यानंतर पोलिसांनी पिस्टल आणि दोन जिवंत काडतुसे पंचांसमक्ष जप्त केली.

याप्रकरणी पोलीस कॉन्स्टेबल अभिजीत माळकर यांनी विश्रामबाग पोलीस ठाण्यात फिर्याद दिली असून भारतीय शस्त्र अधिनियम कलम ३, २५ तसेच महाराष्ट्र पोलीस अधिनियम कलम ३७(१), (३)/१३५ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला

कारवाई करणारे अधिकारी आणि अंमलदार

मा. श्री. तुषार दोशी, पोलीस अधीक्षक, सांगली, मा. श्रीमती कल्पना बारवकर, अपर पोलीस अधीक्षक, सांगली.

यांचे मार्गदर्शानाखाली पोलीस निरीक्षक संजीव झाडे, स्था. गु. अ. शाखा, सांगली. सहा पोलीस निरीक्षक राजेद्र यादव, स्था. गु. अ. शाखा, सांगली. पोलीस उप निरीक्षक महादेव पोवार, स्था. गु. अ. शाखा, सांगली पोहेकॉ / रणजीत जाधव, अतुल माने, प्रकाश पाटील, संदीप पाटील, पोना / श्रीधर बागडी, पोकॉ/ अभिजीत माळकर, संकेत कानडे, ऋषीकेश सदामते, केरुबा चव्हाण, सुरज थोरात, विनायक सनदी, पोकों / विजय पाटणकर, सांगली सायबर पोलीस ठाणे.
जिल्ह्यात अवैध अग्निशस्त्रे बाळगणारे तसेच शरीराविरुद्धचे गंभीर गुन्हे करणाऱ्यांविरोधातील ही मोहीम पुढेही सुरू ठेवण्यात येणार असल्याचे स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने सांगितले.


पुढील तपास विश्रामबाग पोलीस ठाणे करीत आहे.















Weather
Stock Market
Live Cricket
LIVE
धारदार कोयत्याने एसटी बसवर हल्ला; जखमी अवस्थेतही पोलिसाने दोन हत्यारबंद आरोपींना पकडले. पोलिस कॉन्स्टेबल कोंडीबा सरगर गंभीर जखमी | रेकॉर्डवरील आरोपीकडून पिस्टलसह दोन जिवंत काडतुसे जप्त; ६२ हजारांचा मुद्देमाल हस्तगत | आरवडे गावाच्या नामांतराला ग्रामस्थांचा जोरदार विरोध; 'गोपाळपूर' नाव बदल रद्द करण्याची मागणी | सांगलीत पोलीस मुख्यालयाच्या मैदानावर किल्ला भिंतीचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते लोकार्पण | कुंभवडे येथे श्री . राजन पाटील आयुर्वेदिक हॉस्पिटल व ए . एस . पी . एम मेडीकल कॉलेज सांगुळवाडी यांचे आरोग्य शिबिर संपन्न . . . | इनामदार श्री देव रामेश्वर संस्थान आयोजित रक्तदान शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद | श्रावणी दुसऱ्या सोमवारी कुणकेश्वर मंदिरात भाविकांची अलोट गर्दी; ‘हर हर महादेव’च्या जयघोषाने परिसर दुमदुमला | केसरेकर दाम्पत्याच्या मुलांचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी घेतले शैक्षणिक पालकत्व मुलांची भेट घेऊन केले सांत्वन; शिक्षण व वसतिगृहाचा खर्च करण्याची घेतली जबाबदारी | एकजुटीने नशामुक्तीचा निर्धार करूया; अमली पदार्थमुक्त सांगली जिल्हा करूया : पालकमंत्री चंद्रकांत पाटील नशामुक्ती निर्धार पदयात्रेला सांगलीकरांचा उत्स्फूर्त प्रतिसाद; ‘नशामुक्त सांगली, सुरक्षित सांगली’चा सामूहिक संकल्प | आचरा तिठ्यावर २५ ऑगस्टला नारळ लढविण्याची रंगत; महिलांसाठी स्वतंत्र स्पर्धेचे आयोजन |