आचरा तिठ्यावर २५ ऑगस्टला नारळ लढविण्याची रंगत; महिलांसाठी स्वतंत्र स्पर्धेचे आयोजन

👤 तुषार शिंगाडे | 📅 23 August 2026 | 👁 8 Views

आचरा (प्रतिनिधी) : शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षातर्फे पुरस्कृत नारळ लढविणे स्पर्धा मंगळवार, दि. २५ ऑगस्ट रोजी दुपारी २ वाजता आचरा तिठा येथे आयोजित करण्यात आली आहे. यंदा या स्पर्धेचे पाचवे वर्ष असून, प्रथमच महिलांसाठी स्वतंत्र नारळ लढविणे स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.
मुख्य स्पर्धेत प्रथम येणाऱ्या १२८ स्पर्धकांना प्राधान्य देण्यात येणार आहे. विजेत्यास ५,००१ रुपये व चषक, तर उपविजेत्यास ३,००१ रुपये व चषक देण्यात येणार आहे. प्रथम क्रमांकाचा चषक मंदार ओरसकर, नगरसेवक यांच्यातर्फे पुरस्कृत करण्यात आला आहे. स्पर्धेची प्रवेश फी २५० रुपये आहे.
महिलांसाठी स्वतंत्र स्पर्धा
यंदाच्या स्पर्धेचे विशेष आकर्षण म्हणजे आचरा विभागातील महिलांसाठी स्वतंत्र नारळ लढविणे स्पर्धा. महिला विभागातील विजेत्या स्पर्धकास पैठणी, तर द्वितीय क्रमांकाच्या विजेतीस भेटवस्तू देण्यात येणार आहे. पैठणीचे प्रायोजक गजानन गावकर आहेत. महिला विभागात प्रथम ३२ स्पर्धकांना प्राधान्य देण्यात येणार असून, महिलांसाठी स्पर्धेतील नारळ मोफत उपलब्ध करून देण्यात येतील.
या दोन्ही स्पर्धांमध्ये जास्तीत जास्त स्पर्धकांनी सहभागी व्हावे, असे आवाहन आयोजकांनी केले आहे. नाव नोंदणीसाठी रुपम टेमकर ९१६८१०७०१००, विद्यानंद परब ९४२११४४३७६ आणि माणिक राणे ९४२१२३७८१० या क्रमांकांवर संपर्क साधावा.
Weather
Stock Market
Live Cricket
LIVE
आचरा तिठ्यावर २५ ऑगस्टला नारळ लढविण्याची रंगत; महिलांसाठी स्वतंत्र स्पर्धेचे आयोजन | उद्या सांगलीमध्ये नशामुक्त अभियान, जिल्हाधिकारी मैनाक घोष | तासगाव अंनिस शाखेतर्फे वैज्ञानिक दृष्टिकोन दिन साजरा; दाभोलकर हत्येतील सूत्रधारांना शिक्षा करण्याची मागणी | शक्तीपीठविरोधात सांगलीत शेतकऱ्यांचा महासंग्राम; नेत्यांची एकजूट, सरकारविरोधात रणशिंग | कुपवाड दुहेरी हत्याकांडाचा निषेध ; सांगली बंद मोर्चातून आरोपीला फाशीची मागणी | कोळपे मतदारसंघातील साकवांच्या कामांना मंजुरी देऊन निधी द्या; जि.प. सदस्य प्रमोद रावराणे यांची पालकमंत्र्यांकडे मागणी | देवगड आनंदवाडी बंदर विकासासाठी ८५ कोटी मंजूर पुढील १८ महिन्यांत सुरक्षित व सुसज्ज बंदर विकसित करणार; मच्छीमारांच्या विकासासह जिल्ह्याचे दरडोई उत्पन्न वाढण्याचे सामर्थ्य – मत्स्य व्यवसाय मंत्री नितेश राणे | भाजप ओबीसी मोर्चाच्या जिल्हा सरचिटणीसपदी प्रकाश मेस्त्री...!* | सेवा अभियानातून जनतेशी थेट संवाद’; अलिबागमध्ये आमदार प्रमोद जठार, संतोष साखरे यांनी स्वीकारली नागरिकांची निवेदने | छात्रों की गूंज’ला सिंधुदुर्गातून बुलंद पाठिंबा; कणकवलीत काँग्रेसचे शक्तिप्रदर्शन युवक काँग्रेस जिल्हाध्यक्ष किरण टेंबुलकर यांची माहिती |