सांगलीत पोलीस मुख्यालयाच्या मैदानावर किल्ला भिंतीचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते लोकार्पण
👤 संतोष एडके तासगाव |
📅
24 August 2026 |
👁 68 Views
सांगली:
जिल्हा वार्षिक योजना निधीतून पोलीस मुख्यालयाच्या कवायत मैदानावर नूतन साकारण्यात आलेल्या भव्य किल्ला भिंतीचे लोकार्पण पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या शुभहस्ते उत्साहात पार पडले.
या कार्यक्रमाला खासदार विशाल पाटील, आमदार डॉ. सुरेश खाडे, आमदार सुधीर गाडगीळ, महापौर धीरज सूर्यवंशी, जिल्हाधिकारी डॉ. मैनाक घोष, तसेच पोलीस अधीक्षक तुषार दोशी यांची प्रमुख उपस्थिती होती.
याप्रसंगी प्रशासनातील वरिष्ठ अधिकारी जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी विशाल नरवाडे, महापालिका आयुक्त संजीता महापात्र, अपर पोलीस अधीक्षक कल्पना बारवकर आणि पालकमंत्री महोदयांचे विशेष कार्य अधिकारी बाळासाहेब यादव यांच्यासह इतर मान्यवर व पोलीस दलातील कर्मचारी उपस्थित होते.
कवायत मैदानाच्या सुशोभीकरणासोबतच पोलीस दलाच्या शिस्त व पराक्रमाचे प्रतीक म्हणून या किल्ला भिंतीची उभारणी करण्यात आली असून, यामुळे मैदानाची शोभा आणखी वाढली आहे.