महात्मा फुले जन आरोग्य योजनेत मोठ्या प्रमाणात बनावट दावे होत असल्याचा संशय आल्याने राज्य सरकारने SIT - (Special Investigation Team )नेमली आहे.यामध्ये 15,407 संशयास्पद दावे समोर आले आहेत SIT ला संपूर्ण चौकशी करून 30 दिवसात शासनाला अहवाल सादर करण्याचे बंधन आहे.यामध्ये SIT खालील मुद्दे तपासणार आहे.
रुग्णाने खरंच उपचार घेतले का? की फक्त कागदावर दावा दाखल केला आहे ?,रुग्णालयाने संशयास्पद उपचारांचे दावे केले आहेत का?एजंट किंवा मध्यस्थांचा सहभाग आहे का?खोटे, अनावश्यक किंवा जास्त खर्चीचे दावे करण्यात आले का इत्यादी गोष्टी.
महत्वाची बाब म्हणजे SIT पथक गठित झाल्यापासून अवघे 30 दिवसांत अहवाल सादर करणे पथकाला बंधनकारक आहे त्यानुसार यामध्ये दोषी आढळल्यास कडक कारवाई अटळ आहे