रेशनकार्ड धारकांसाठी मोठा बदल! 15 ऑगस्ट 2026 पासून राज्यात जुने कागदी रेशनकार्ड बंद करण्यात येणार आहेत. त्याऐवजी आता स्मार्ट रेशनकार्ड दिले जाणार आहेत.
स्मार्ट रेशन डिजिटलकार्डवर चिप असेल. त्यामुळे रेशन दुकानात पटकन ओळख पटेल.बनावट कार्ड आणि धान्य घोटाळ्याला आळा बसेल. यामुळे माहिती सुरक्षित राहील आणि एका ठिकाणाहून दुसरीकडे ट्रान्सफर करणे सोपे होईल.आधारशी लिंक असल्याने पात्र लाभार्थ्यांनाच लाभ मिळेल
15 ऑगस्टपूर्वी ज्या नागरिकांकडे कागदी रेशनकार्ड आहे त्यांनी आपले e-KYC आणि आधार लिंक करून घेणे आवश्यक आहे. नवीन स्मार्ट कार्डचे वाटप कसे होणार याची माहिती लवकरच अन्न व नागरी पुरवठा विभागाकडून जाहीर केली जाईल.
या निर्णयामुळे रेशन वाटप प्रक्रिया पारदर्शक आणि जलद होणार आहे.