पर्ल्स (PACL) गुंतवणूकदारांसाठी महत्त्वाचे अपडेट

👤 राहुल टिबे ईश्वरपूर,सांगली | 📅 05 August 2026 | 👁 56 Views
पर्ल्स (PACL) गुंतवणूकदारांसाठी महत्त्वाचे अपडेट
नवी दिल्ली :-PACL Ltd(पर्ल्स ) मधील गुंतवणूकदारांसाठी दिलासादायक बातमी आहे. जस्टिस (निवृत्त) आर. एम. लोढा समितीने बँक खात्याच्या त्रुटी दुरुस्त करण्यासाठीची मुदत वाढवली आहे. यापूर्वी 7 मे 2026 ते 6 ऑगस्ट 2026 पर्यंत गुंतवणूकदारांना बँक खात्यातील त्रुटी दुरुस्त करण्याची संधी देण्यात आली होती.आता ही सुविधा 6 ऑक्टोबर 2026 पर्यंत वाढवण्यात आली आहे. जास्तीत जास्त गुंतवणूकदारांना संधी मिळावी यासाठी मुदतवाढ देण्यात आली.ज्या गुंतवणूकदारांचे PACL रिफंड क्लेम बँक व्हेरिफिकेशन फेल झाल्यामुळे प्रलंबित आहेत, त्यांच्यासाठी ही संधी आहे.महत्वाचे म्हणजे ही सुविधा फक्त बँक खात्याशी संबंधित त्रुटींसाठी आहे. निवृत्त न्यायाधीश आर. एम. लोढा समिती PACL गुंतवणूकदारांना टप्प्याटप्प्याने रिफंड देत आहे.
तरी सर्व गुंतवणूकदार तसेच फिल्ड वर्कर्सनीं लवकरात लवकर आपले बँक खाते संदर्भात असणाऱ्या त्रुटी दुरुस्त करून घ्याव्या असे आवाहन जनलोक प्रतिष्ठान आणि सर्व सीनियर्स यांच्यावतीने करण्यात आले आहे.



Weather
Stock Market
Live Cricket
LIVE
पर्ल्स (PACL) गुंतवणूकदारांसाठी महत्त्वाचे अपडेट | कागदी रेशनकार्ड 15 ऑगस्टपासून बंद! | नागरिकांना दिलासा! आधार कार्डसाठी असे जन्म दाखले ग्राह्य धरणार | सामाईक विहिरीवरील अतिक्रमण हटविण्याच्या मागणीसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बेमुदत उपोषण सुरू | सावळजमध्ये साहित्यरत्न डॉ. अण्णाभाऊ साठे यांच्या १०६ व्या जयंतीनिमित्त गरजू विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप | ग्रामीण मातीतला ओम आज ‘टीम इंडिया’चा स्टार; व्हॉलीबॉलच्या स्वप्नाला मिळाली आंतरराष्ट्रीय भरारी | झरे येथे एकदिवसीय मराठी साहित्य संमेलन उत्साहात संपन्न | तासगाव तालुक्यात समन्यायी पाणी वाटपाची गरज; "शेतकऱ्यांना न्याय्य पाणी कधी मिळणार?" – डॉ. भारत पाटणकर | 9 ऑगस्ट ला मुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस आष्टा नगरीत | ऊसतोड कामगाराचा मुलगा ते शिवछत्रपती पुरस्कार विजेता; शंकर गदईंचा प्रेरणादायी प्रवास विद्यार्थ्यांसमोर |