स्वामी विवेकानंद आदिवासी विद्यार्थी वस्तीगृह, देवलापार येथील सोळा वर्षीय विद्यार्थी बेपत्ता

👤 नितिन बोरसरे, रामटेक | 📅 03 November 2026 | 👁 1 Views
स्वामी विवेकानंद आदिवासी विद्यार्थी वस्तीगृह, देवलापार येथील सोळा वर्षीय विद्यार्थी बेपत्ता
दहावीची परीक्षा देण्यासाठी गेलेल्या 16 वर्षीय विद्यार्थी संग्राम परीक्षा संपल्यानंतर विद्यालया बाहेर पडला. मात्र तो राहत असलेल्या स्वामी विवेकानंद आदिवासी विद्यार्थी वस्तीगृहात परतलाच नसल्याने तो बेपत्ता का व कसा झाला यासोबतच वस्तीगृहाच्या प्रशासनाच्या सुरक्षितेवर गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. मागील 29 ऑक्टोंबर पासून बेपत्ता विद्यार्थी अद्यापही परत न आल्याचे दोन नोव्हेंबरला समोर आले आहे. त्यामुळे वस्तीगृहाच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. संग्राम भीमप्रसाद पटले वय सोळा वर्षे राहणार तिरोडी ग्राम मिर्जापुर तालुका पांढरवाडी जिल्हा बालाघाट मध्य प्रदेश असे बेपत्ता विद्यार्थ्याचे नाव आहे. देवलापार पोलिसात याची तक्रार करण्यात आली आहे.शासन आदिवासी वस्तीगृहांवर करोडो रुपये खर्च करते मात्र व्यवस्थापन त्यांच्या निवासाच्या सोयी, सुविधा, सुरक्षा व देखरेखीबाबत फारसे गंभीर राहत नसल्याचे कित्येकदा लक्षात आले आहे वस्तीगृहाच्या या निष्काळजीपणावर शासन, प्रशासन कोणती कारवाई करते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
Weather
Stock Market
Live Cricket
LIVE
सांगली जिल्हा बँकेत माजी खासदार संजय पाटील यांचा विजय :माजी आमदार सुमन पाटील यांचा पराभव! | कामेरी नाका खून प्रकरणातील दोघे आरोपी २४ तासांत जेरबंद; सांगली एलसीबी व ईश्वरपूर पोलिसांची संयुक्त कारवाई. | स्वामी विवेकानंद आदिवासी विद्यार्थी वस्तीगृह, देवलापार येथील सोळा वर्षीय विद्यार्थी बेपत्ता | परतूरमध्ये ५ नोव्हेंबरला भव्य संत संमेलन व हिंदू धर्म महामेळावा! | जळगाव जिल्हा बँक निवडणुकीत मोठा राजकीय भूकंप | *जिल्हा परिषद एसीबीचा मोठी कारवाई ! १० हजारांची लाच घेताना उपविभागीय अधिकारी आणि कनिष्ठ अभियंता जाळ्यात* | रान पिकवलं, रेकॉर्ड मोडला! भडगावच्या संजय पाटलांचा ज्वारी उत्पादनात संपूर्ण महाराष्ट्रात डंका; हेक्टरी १०२.२५ क्विंटलचा नवा उच्चांक* | उमरेड - करह्रांडला अभ्यारण्यातील गोठणगाव चा युवा नर वाघ पोहोचला पेंचच्या चोर बाहुली जंगलात | सांगली जिल्हा बँकेच्या रणांगणात राजकीय भूकंपाची चाहूल! | भडगाव येथे AEG फाउंडेशनच्या वतीने कृषी उद्योजकांना प्रमाणपत्रांचे वितरण . |