रान पिकवलं, रेकॉर्ड मोडला! भडगावच्या संजय पाटलांचा ज्वारी उत्पादनात संपूर्ण महाराष्ट्रात डंका; हेक्टरी १०२.२५ क्विंटलचा नवा उच्चांक*

👤 शुभम सुराणा जळगाव | 📅 02 November 2026 | 👁 129 Views
रान पिकवलं, रेकॉर्ड मोडला! भडगावच्या संजय पाटलांचा ज्वारी उत्पादनात संपूर्ण महाराष्ट्रात डंका; हेक्टरी १०२.२५ क्विंटलचा नवा उच्चांक*

भडगाव (विषेश प्रतिनिधी :-
मेहनत, योग्य नियोजन आणि आधुनिक तंत्रज्ञानाची जोड मिळाली तर मातीतूनही सोनं पिकवता येतं, हे भडगाव तालुक्यातील माणकी येथील प्रयोगशील शेतकरी संजय पुंडलिक पाटील यांनी सिद्ध करून दाखवलं आहे. कृषी विभागामार्फत जाहीर करण्यात आलेल्या गेल्या रब्बी हंगामातील 'राज्यस्तरीय पीक स्पर्धेत' संजय पाटील यांनी ज्वारीच्या सर्वसाधारण गटात हेक्टरी तब्बल १०२.२५ क्विंटल इतके विक्रमी उत्पादन घेत राज्यात प्रथम क्रमांक पटकावला आहे. त्यांच्या या घवघवीत यशामुळे संपूर्ण जळगाव जिल्ह्याची मान अभिमानाने उंचावली आहे.
विक्रमी उत्पादनाचे 'गमक' काय?
आपल्या या विक्रमी यशाविषयी माहिती देताना संजय पाटील यांनी सांगितले की, "रब्बी हंगामात त्यांनी 'एडवंटा' कंपनीच्या 'पीएसी ५३७ वर्टेक्स' (PAC 537 Vertex) या सुधारित वाणाची निवड केली होती. योग्य वाणाची निवड, जमिनीची मशागत, संतुलित खत व्यवस्थापन आणि गरजेनुसार पाण्याचे काटेकोर नियोजन या चतुःसूत्रीमुळेच हेक्टरी १०२.२५ क्विंटलसारखे अशक्य वाटणारे उत्पादन प्रत्यक्षात आणता आले."
कंपनीकडून सत्कार व गौरव
संजय पाटील यांच्या या अभूतपूर्व कामगिरीची दखल घेत 'एडवंटा' कंपनीच्या वतीने त्यांचा शाल, श्रीफळ आणि सन्मानचिन्ह देऊन जाहीर सत्कार करण्यात आला.
या गौरव सोहळ्याप्रसंगी एडवंटा कंपनीचे विभागीय व्यवस्थापक भूषण पाटील, कंपनी प्रतिनिधी अनिल पाटील, गावाचे पोलीस पाटील तसेच परिसरातील शेतकरी व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
संजय पाटील यांच्या या ऐतिहासिक कामगिरीबद्दल भडगाव तालुक्यासह संपूर्ण खान्देशातून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत असून, त्यांचे हे यश इतर दुष्काळी व रब्बी हंगाम घेणाऱ्या शेतकऱ्यांसाठी निश्चितच दिशादर्शक ठरत आहे.
Weather
Stock Market
Live Cricket
LIVE
*जिल्हा परिषद एसीबीचा मोठी कारवाई ! १० हजारांची लाच घेताना उपविभागीय अधिकारी आणि कनिष्ठ अभियंता जाळ्यात* | रान पिकवलं, रेकॉर्ड मोडला! भडगावच्या संजय पाटलांचा ज्वारी उत्पादनात संपूर्ण महाराष्ट्रात डंका; हेक्टरी १०२.२५ क्विंटलचा नवा उच्चांक* | उमरेड - करह्रांडला अभ्यारण्यातील गोठणगाव चा युवा नर वाघ पोहोचला पेंचच्या चोर बाहुली जंगलात | सांगली जिल्हा बँकेच्या रणांगणात राजकीय भूकंपाची चाहूल! | भडगाव येथे AEG फाउंडेशनच्या वतीने कृषी उद्योजकांना प्रमाणपत्रांचे वितरण . | युवरंग २०२६ वर मुळजी जेठा महाविद्यालयाची मोहोर; चोपडा महाविद्यालय उपविजेतेपदी! | एका क्षणात होत्याचे नव्हते! भरधाव कारचा भीषण अपघात; तेलंगणातील चालकाचा दुर्दैवी अंत, तिघे रुग्णालयात मृत्यूशी झुंज देत आहे | रक्तदानाच्या माध्यमातून गरजू रुग्णांना जीवनदान देणाऱ्या कुचीच्या वैभव सरवदे यांना राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित! | कुचीमध्ये विहिरीत आढळला अज्ञात व्यक्तीचा मृतदेह; गावात खळबळ! | न्यायालयाचे ‘कायदेशीर कवच’ विद्यार्थ्यांच्या दारात: भडगावमध्ये ‘सुरक्षित बचपन’ अभियानाचा दिमाखदार समारोप! |