उमरेड - करह्रांडला अभ्यारण्यातील गोठणगाव चा युवा नर वाघ पोहोचला पेंचच्या चोर बाहुली जंगलात

👤 नितिन बोरसरे, रामटेक | 📅 02 November 2026 | 👁 8 Views
उमरेड - करह्रांडला अभ्यारण्यातील गोठणगाव चा युवा नर वाघ पोहोचला पेंचच्या चोर बाहुली जंगलात
उमरेड- करांडला वन्यजीव अभयारण्यातील गोठणगाव झोन मधून प्रवास करीत एक युवा नर वाघ पेंच अभयारण्यातील चोर बाहुली वनक्षेत्रात पोहोचल्याचे निष्पन्न रविवार दिनांक एक नोव्हेंबरला पुन्हा झाले आहे. जंगल सफारी दरम्यान पर्यटकांना तसेच वन कर्मचाऱ्यांनाही या नर वाघाचे दीर्घकाळ दर्शन होत आहे. शरीरावरील वैशिष्ट्यपूर्ण पट्ट्याच्या रचनेंवरून त्याची ओळख पटविण्यात आली आहे. उमरेड- करांडला अभयारण्यातून स्वतंत्र अधिवासाच्या शोधात निघालेला हा अंदाजे तीन ते चार वर्षाचा नर वाघ पेंच च्या चोरबाहुली वनपरिक्षेत्रात आपले वर्चस्व स्थापित करू पाहत असल्याचे वनपरिक्षेत्र अधिकारी जयेश तायडे यांनी सांगितले. हा वाघ प्रसिद्ध एफ 2 या वाघिणीच्या पाच बछड्यांपैकी एक असल्याचे त्याच्या शरीरावरील पट्ट्यांवरून ओळखण्यात आले आहे. या पट्ट्यांच्या तुलनात्मक निरीक्षणावरून वाघाची स्वतंत्र ओळख पटवता आल्याचे डेक्कन डीप्सचे वन्यजीव अभ्यासक पियुष आकरे, चोरबाहुली गेटचे वन मार्गदर्शक अजय सोनटक्के, अविनाश चौधरी यांनी सांगितले. या नर वाघाच्या प्रवासामुळे वाघांच्या नैसर्गिक स्थलांतराचे महत्त्व पुन्हा एकदा अधोरेखित झाले आहे.
Weather
Stock Market
Live Cricket
LIVE
उमरेड - करह्रांडला अभ्यारण्यातील गोठणगाव चा युवा नर वाघ पोहोचला पेंचच्या चोर बाहुली जंगलात | सांगली जिल्हा बँकेच्या रणांगणात राजकीय भूकंपाची चाहूल! | भडगाव येथे AEG फाउंडेशनच्या वतीने कृषी उद्योजकांना प्रमाणपत्रांचे वितरण . | युवरंग २०२६ वर मुळजी जेठा महाविद्यालयाची मोहोर; चोपडा महाविद्यालय उपविजेतेपदी! | एका क्षणात होत्याचे नव्हते! भरधाव कारचा भीषण अपघात; तेलंगणातील चालकाचा दुर्दैवी अंत, तिघे रुग्णालयात मृत्यूशी झुंज देत आहे | रक्तदानाच्या माध्यमातून गरजू रुग्णांना जीवनदान देणाऱ्या कुचीच्या वैभव सरवदे यांना राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित! | कुचीमध्ये विहिरीत आढळला अज्ञात व्यक्तीचा मृतदेह; गावात खळबळ! | न्यायालयाचे ‘कायदेशीर कवच’ विद्यार्थ्यांच्या दारात: भडगावमध्ये ‘सुरक्षित बचपन’ अभियानाचा दिमाखदार समारोप! | 39 वर्षांच्या प्रदीर्घ सेवेनंतर मुंबई पोलीस दलातील PSI संजय टिबे सेवानिवृत्त | शिवसेनेच्या दोन तर भाजपच्या एका उमेदवाराची संचालकपदी निवड; पारोळा, एरंडोल आणि भुसावळमध्ये बिनविरोध विजय |