भाजप ओबीसी मोर्चाच्या जिल्हा सरचिटणीसपदी प्रकाश मेस्त्री...!*
👤 तुषार शिंगाडे |
📅
21 August 2026 |
👁 8 Views
आचरा
भारतीय जनता पार्टीचे ज्येष्ठ कार्यकर्ते तथा उद्योजक तथा चिंदर गावचे सुपुत्र प्रकाश दिनकर मेस्त्री यांची भाजप ओबीसी मोर्चाच्या सिंधुदुर्ग जिल्हा सरचिटणीसपदी नियुक्ती करण्यात आली आहे. ओरोस येथील वसंत विहारमधील भाजप जिल्हा कार्यालयात आयोजित ओबीसी मोर्चाच्या कार्यक्रमात जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत यांच्या हस्ते मेस्त्री यांना नियुक्तीपत्र प्रदान करण्यात आले.
प्रकाश मेस्त्री हे भाजपचे ज्येष्ठ कार्यकर्ते असून पक्षसंघटन मजबूत करण्यासाठी त्यांनी सातत्याने योगदान दिले आहे. त्यांच्या संघटनात्मक कार्याची दखल घेत पक्षाने त्यांच्यावर ओबीसी मोर्चाच्या जिल्हा सरचिटणीसपदाची जबाबदारी सोपविली आहे. या नियुक्तीमुळे ओबीसी समाजाच्या संघटनात्मक बांधणीला अधिक बळ मिळेल, असा विश्वास व्यक्त जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत यांनी व्यक्त केला.
यावेळी प्रकाश पारकर, छोटू पारकर, जिल्हा उपाध्यक्ष जगदीश चव्हाण आदी बहुसंख्य भाजप कार्यकर्ते उपस्थित होते.