सद्गुरु श्री श्री साखर कारखान्याचे चेअरमन एन शेषागिरी रावसर यांनी सालाबाद प्रमाणे चालू वर्षी सुद्धा आषाढी एकादशीचे औचित्य साधून श्रीक्षेत्र आळंदी ते पंढरपूर सर्व घटकांना सुखी संपन्न दीर्घायुष्य लाभण्यासाठी आणि सर्व शेतकरी बांधवांना सुख समृद्धी लाभण्यासाठी श्री क्षेत्र आळंदी ते पंढरपूर पदयात्रेचे आयोजन केले होते. त्यांच्यासोबत सोमा एंटरप्राईजेसचे शिवानंद चौगुला (बेळगाव) हेही सहभागी झाले होते. ज्ञानोबा तुकाराम यांच्या जयघोष यामध्ये आणि शेतकरी राजाला सुख समृद्धी लाभू दे यासाठी पदयात्रेतून प्रवास करत असताना जागोजागी त्यांचे अनेक शेतकरी बांधव त्याचप्रमाणे सद्गुरु परिवाराचे सदस्य हे त्यांचा सन्मान करीत होते. माळशिरस तालुक्यात प्रवेश करतात सद्गुरु श्री श्री साखर कारखान्याचे चेअरमन बाळासाहेब कर्नवर पाटील यांच्या परिवारातर्फे तर पंढरपूर तालुक्यात प्रवेश करताच सद्गुरु श्री श्री साखर कारखान्याचे संचालक मोहनराव बागल व त्यांचे सहकारी त्याचप्रमाणे असंख्य सभासद बांधव व ग्रामस्थांनी या पदयात्रेच्या निमित्ताने त्यांचा सन्मान करून अशा प्रकारचा त्यांचा ध्येयवादी प्रवास अतिशय चांगल्या पद्धतीचा असून समाजाला दिशा देणारा आहे अशा प्रकारचे अनेकांनी आपले मनोगत व्यक्त केले. श्रीक्षेत्र पंढरपूर येथून श्री विठ्ठल रुक्मिणी मातेचे दर्शन घेतल्यानंतर सद्गुरु श्री श्री साखर कारखान्यावरती त्यांचा सन्मान एच आर अँड एडमिन मॅनेजर सचिन खटके, कॅन मॅनेजर सुनील सावंत, सिविल इंजिनिअर अवधूत जमदाडे, शेती अधिकारी दत्ता क्षिरसागर,ॲग्री सुपरवायझर पिसे व सर्व खाते प्रमुख कर्मचारी बांधवांनी पुष्पहार श्रीफळ शाल देऊन केला. सदर पद यात्रेच्या संदर्भात सुनील सावंत यांनी गौरवोद्गार काढून सर्वांच्या वतीने समाधान व्यक्त केले.