४ वर्षांपासून रखडलेले भटवाडी–दिर्बादेवी ११ के वी लाइन चे काम अखेर पूर्ण

👤 तुषार शिंगाडे सिंधुदुर्ग | 📅 25 July 2026 | 👁 169 Views
४ वर्षांपासून रखडलेले भटवाडी–दिर्बादेवी ११ के वी लाइन चे काम अखेर पूर्ण
हरकुळ बुद्रुक गावातील भटवाडी ते दिर्बादेवी या मार्गावरील गेल्या ४ वर्षांपासून रखडलेले ११ के वी चे काम अखेर पूर्ण झाले आहे. या कामामुळे भटवाड़ी, जंगमवाडी, सोनारवाड़ी, देऊलवाड़ी, गावठनवाड़ी, व्हावटवाडी, भाटदूकान, शेखवाड़ी खड़कवाड़ी परिसरातील नागरिकांना रात्रीच्या वेळी सुरक्षित आणि उज्ज्वल प्रवासाची सुविधा उपलब्ध झाली आहे.

*या रखडलेल्या कामाचा सातत्याने पाठपुरावा करून ते पूर्णत्वास नेण्यासाठी भारतीय जनता पक्षाचे ज़िल्हा परिषद सदस्य सन्मा; मनोज रावराणे साहेब,भारतीय जनता पक्षाचे अल्पसंख्यांक तालुका अध्यक्ष सन्मा: इम्रान शेख , तनटामुक्ति अध्यक्ष सन्मा: राजू पेड़नकर, निलेश तेली, व भा.ज. पा अल्पसंख्यांक तालुका सचिव सरफराज़ शेख यांनी अथक प्रयत्न केले*. त्यांच्या ह्या प्रयत्नांमुळे अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेला प्रश्न मार्गी लागल्याने ग्रामस्थांमध्ये समाधानाचे वातावरण आहे.

ग्रामस्थांनी या कामासाठी सहकार्य करणारे संबंधित MSCB चे section अधिकारी तावड़े साहेब व कर्मचारी रूपेश दाभोलकर व पूर्ण टीम चे सर्वांचे आभार व्यक्त करत गावाच्या विकासासाठी अशाच प्रकारे प्रलंबित कामेही लवकर पूर्ण व्हावीत, अशी अपेक्षा व्यक्त केली आहे.
Weather
Stock Market
Live Cricket
LIVE
उरुण- ईश्वरपुर मध्ये MPSC विद्यार्थ्यांचा भव्य मोर्चा | मतदार यादी पुनरीक्षणाची प्रक्रिया निष्पक्ष, पारदर्शक व सर्वसमावेशक राबवावी- मतदार यादी निरीक्षक शीतल तेली-उगले | जतच्या पवनचक्क्यांमधील तारचोरीचा पर्दाफाश; एकाला अटक १४.७४ लाखांचा मुद्देमाल जप्त; सात चोरीचे गुन्हे उघडकीस | एसटी आरक्षणापासून नामकरणापर्यंत; विविध मागण्यांसाठी तासगावात धनगर समाज एकवटला : तासगाव तहसीलदारांना निवेदन; वीर शिंग्रोबा, अहिल्यादेवी होळकर यांच्या नावासह देवस्थानांच्या कारभारात पारदर्शकतेची मागणी | चोरीचे सोने विक्रीला आला अन् सांगली एलसीबी पोलिसांच्या जाळ्यात अडकला ४२ ग्रॅम सोन्याचे दागिने हस्तगत; ६ लाख ३० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त | शिक्षक दिनी आदर्श शिक्षक पुरस्कारासाठी श्री. घनश्याम सुभाष पाटील यांची निवड | चोरीचे सोने विकायला आला अन् सांगली एलसीबीच्या पोलिसांच्या हाती 'मुक्या "लागला; ‘मुक्या’कडून ६ लाखांचे दागिने जप्त | तासगावात उद्या सकाळी 10 वाजता रस्ता रोको सकल मराठा समाजाने पोलिसांना दिले निवेदन, | तासगाव-कवठेमहांकाळचे पालकत्व आमदार गोपीचंद पडळकरांकडे द्या; भाजप कार्यकर्त्यांची जोरदार मागणी | ईश्वरपूर शहरातील सिग्नल यंत्रणा धूळ खात! लाखो रुपयांचा चुराडा, विद्यार्थ्यांचा जीव धोक्यात |