माण-खटाव विधानसभा युवक काँग्रेस अध्यक्षपदी अभ्यासू युवा नेतृत्व महेश करचे यांची निवड

👤 आकाश दडस सातारा | 📅 26 July 2026 | 👁 130 Views
माण-खटाव विधानसभा युवक काँग्रेस अध्यक्षपदी अभ्यासू युवा नेतृत्व महेश करचे यांची निवड
• सर्वसामान्य, शेतकरी आणि युवकांच्या प्रश्नांवर लढणाऱ्या निर्भीड नेतृत्वाची निवड • प्रदेशाध्यक्ष शिवराज मोरे यांच्या हस्ते नियुक्तीपत्र प्रदान • काँग्रेसचे संघटन अधिक मजबूत करून अन्यायाविरोधातील लढा तीव्र करणार : महेश करचे
शेतकरी, कामगार, विद्यार्थी आणि महिलांच्या विविध प्रश्नांवर सातत्याने रस्त्यावर उतरून संघर्ष करणारे माण-खटावमधील अभ्यासू, निर्भीड आणि सामाजिक भान असलेले युवा नेतृत्व महेश मारुती करचे यांची माण-खटाव विधानसभा युवक काँग्रेसच्या अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे.

महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष शिवराज दादा मोरे यांच्या हस्ते पुणे येथे आयोजित कार्यक्रमात महेश करचे यांना नियुक्तीपत्र प्रदान करण्यात आले. या नियुक्तीमुळे माण-खटाव तालुक्यात काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले असून विविध स्तरांतून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

महेश करचे यांनी नुकत्याच झालेल्या कुकुडवाड जिल्हा परिषद गटातून काँग्रेस पक्षाच्या उमेदवार म्हणून निवडणूक लढवली होती. गेल्या दोन वर्षांपासून त्यांनी शेतकऱ्यांच्या वीज व पाणी प्रश्नांपासून ते कामगारांचे हक्क, विद्यार्थ्यांच्या समस्या तसेच महिलांवरील अन्यायाविरोधात सातत्याने आंदोलने करून जनतेचा आवाज बुलंद केला आहे. त्यांच्या या सातत्यपूर्ण कार्याची दखल घेत पक्षाने त्यांच्यावर ही महत्त्वाची जबाबदारी सोपवली आहे.

यावेळी युवक काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष प्रथमेश आबनावे, सातारा जिल्हा उपाध्यक्ष डॉ. सागर सावंत, महाराष्ट्र प्रदेश सचिव पंकज पोळ, डॉ. प्रसाद ओंबासे, बाळराजे विरकर यांच्यासह काँग्रेसचे अनेक पदाधिकारी उपस्थित होते.

महेश करचे यांच्या नियुक्तीबद्दल महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ, सातारा जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष नामदेव पाटील, युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष राहुलराज पवार तसेच माजी जिल्हाध्यक्ष रणजित देशमुख यांनी त्यांचे अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.



"राष्ट्रीय काँग्रेस आणि युवक काँग्रेसच्या वरिष्ठ नेतृत्वाने माझ्यावर दाखवलेला विश्वास मी पूर्णपणे सार्थ ठरवेन. माण-खटाव विधानसभा मतदारसंघात तरुण, निष्ठावंत आणि सर्वसामान्यांशी जोडलेले कार्यकर्त्यांचे मजबूत संघटन उभारण्यावर माझा भर असेल. केंद्र आणि राज्य सरकारच्या जनविरोधी व चुकीच्या धोरणांविरोधातील आमचा संघर्ष अधिक तीव्र करू. माण-खटावमधील कोणत्याही सामान्य नागरिकावर, शेतकऱ्यावर किंवा तरुणावर अन्याय होऊ देणार नाही. सर्वसामान्यांच्या हक्कांसाठी मी कायम अग्रभागी राहून लढा देत राहीन.

Weather
Stock Market
Live Cricket
LIVE
उरुण- ईश्वरपुर मध्ये MPSC विद्यार्थ्यांचा भव्य मोर्चा | मतदार यादी पुनरीक्षणाची प्रक्रिया निष्पक्ष, पारदर्शक व सर्वसमावेशक राबवावी- मतदार यादी निरीक्षक शीतल तेली-उगले | जतच्या पवनचक्क्यांमधील तारचोरीचा पर्दाफाश; एकाला अटक १४.७४ लाखांचा मुद्देमाल जप्त; सात चोरीचे गुन्हे उघडकीस | एसटी आरक्षणापासून नामकरणापर्यंत; विविध मागण्यांसाठी तासगावात धनगर समाज एकवटला : तासगाव तहसीलदारांना निवेदन; वीर शिंग्रोबा, अहिल्यादेवी होळकर यांच्या नावासह देवस्थानांच्या कारभारात पारदर्शकतेची मागणी | चोरीचे सोने विक्रीला आला अन् सांगली एलसीबी पोलिसांच्या जाळ्यात अडकला ४२ ग्रॅम सोन्याचे दागिने हस्तगत; ६ लाख ३० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त | शिक्षक दिनी आदर्श शिक्षक पुरस्कारासाठी श्री. घनश्याम सुभाष पाटील यांची निवड | चोरीचे सोने विकायला आला अन् सांगली एलसीबीच्या पोलिसांच्या हाती 'मुक्या "लागला; ‘मुक्या’कडून ६ लाखांचे दागिने जप्त | तासगावात उद्या सकाळी 10 वाजता रस्ता रोको सकल मराठा समाजाने पोलिसांना दिले निवेदन, | तासगाव-कवठेमहांकाळचे पालकत्व आमदार गोपीचंद पडळकरांकडे द्या; भाजप कार्यकर्त्यांची जोरदार मागणी | ईश्वरपूर शहरातील सिग्नल यंत्रणा धूळ खात! लाखो रुपयांचा चुराडा, विद्यार्थ्यांचा जीव धोक्यात |