विकास सोसायट्यांनी खत विक्रीचे लायसन्स तातडीने काढावीत – प्रकाश सावंत

👤 तुषार शिंगाडे सिंधुदुर्ग | 📅 26 July 2026 | 👁 67 Views
विकास सोसायट्यांनी खत विक्रीचे लायसन्स तातडीने काढावीत – प्रकाश सावंत
कणकवली खरेदी-विक्री संघाची सर्वसाधारण सभा उत्साहात ; सभेत विविध विषयांवर झाली चर्चा
कणकवली खरेदी विक्री संघाच्या माध्यमातून सभासदांना न्याय देण्यासाठी आमचे प्रयत्न आहेत. गेल्यावर्षी 22 विकास संस्थांना खत विक्री केली होती.मात्र, यावेळी लायसन्स नसलेल्या संस्थांना खत देता आले नाही,कारण खताच्या वाहनांना जीपीएस लावण्यात आले होते. इतर खते देखील उशिरा उत्पादन झाल्यामुळे उशिरा आली. तालुक्यात फक्त खत पुरवठा लायसन्स असलेल्या 3 संस्था आहेत.सांगावे आणि नांदगाव पॉज मशीन नाहीत. परंतु, संघात आलेल्या शेतकऱ्यांना आम्ही खते दिली. त्यामुळे खत विक्रीसाठी विकास सोसायट्यांनी खत विक्रीचे लायसन्स तातडीने काढावीत असे आवाहन संघाचे चेअरमन प्रकाश सावंत यांनी केले.
कणकवली तालुका खरेदी-विक्री संघाची वार्षिक सर्वसाधारण सभा नुकतीच संघाच्या कार्यालयात पार पडली. या सभेत बॅंक संचालक विठ्ठल देसाई , कृषी उत्पन्न बाजार समितीचे चेअरमन तुळशीदास रावराणे , संघाचे संचालक मिथिल सावंत , बबन हळदिवे , पंढरी वायंगणकर , संजय शिरसाट , अतुल दळवी, किरण गांवकर, रघुनाथ राणे , प्रशांत सावंत, स्मिता पावस्कर, विनिता बुचडे, सोसायटी चेअरमन भगवान लोके, वसंत तेंडुलकर, सुनील गणपत सावंत, चंद्रहास मर्गज, अरविंद डेगवेकर, व्यवस्थापक धोंडी परब , माजी व्यवस्थापक प्रकाश घाडीगावकर ,अनिल सुखटणकर , गणेश तावडे,राजेंद्र सावंत यांच्यासह तालुक्यातील विकास संस्थांचे चेअरमन व संघाचे सभासद उपस्थित होते. या सभेला कृषी उत्पन्न समितीचे सभापती तुळशीदास रावराणे यांची कृषी पणन संचालक पदी निवड झाल्याबद्दल पुष्पगुच्छ देवून चेअरमन प्रकाश सावंत यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

सभेत मागील आर्थिक वर्षाचा अहवाल, ताळेबंद, नफा-तोटा पत्रक तसेच अंदाजपत्रकास मंजुरी देण्यात आली. संघाच्या माध्यमातून शेतकऱ्यांना दर्जेदार बियाणे, खते, कृषी निविष्ठा तसेच आवश्यक साहित्य उपलब्ध करून देण्याबाबत चर्चा करण्यात आली. अहवालामध्ये विविध वर्गवारीत आर्थिक वर्षातील तरतूदीबाबत काही सभासदांनी विचारणा करत सुचना केल्या. त्यावर अध्यक्षांनी आपल्या सुचना अंमलात आणल्या जातील , असे सांगितले. यावेळी सभासदांनी विविध सूचना मांडत संघाच्या भविष्यातील वाटचालीबाबत आपली मते व्यक्त केली. शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी तसेच ग्रामीण भागातील कृषी क्षेत्राला बळकटी देण्यासाठी संघाने अधिक व्यापक स्वरूपात काम करावे, अशी अपेक्षा सभासदांनी व्यक्त केली. या सभेत संघाला ऑडीट वर्ग अ मिळाल्याबद्दल असलदे सोसायटी चेअरमन भगवान लोके यांनी अभिनंदन ठराव मांडला. सभेच्या शेवटी उपस्थितांचे आभार मानण्यात आले.
Weather
Stock Market
Live Cricket
LIVE
विकास सोसायट्यांनी खत विक्रीचे लायसन्स तातडीने काढावीत – प्रकाश सावंत | ४ वर्षांपासून रखडलेले भटवाडी–दिर्बादेवी ११ के वी लाइन चे काम अखेर पूर्ण | राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रम (RBSK)चे काम राम भरोसे, या विरोधात मळेवाड कोंडुरे उपसरपंच हेमंत मराठे करणार उपोषण | रविवारी 'मुक्तसंवाद'मध्ये संगीत विशारद प्रसादजी शेवडे यांच्याशी सुरेल संवाद | उपरण्यावर अवतरला पंढरीचा विठुराया; देवगडच्या कलाकाराची भक्तीला रंगांची अनोखी अर्पणवेल | पूरग्रस्तांच्या मदतीसाठी भाजपाचा मदतीचा हात; जीवनावश्यक अन्नधान्य किटचे वाटप | आषाढी एकादशीचे अनोखे कलादर्शन; तांदळाच्या दाण्यावर अवतरले पांडुरंग;रिया कांबळीच्या अद्वितीय कलेला सलाम.. | तासगावच्या दीडशे वर्षांच्या सांस्कृतिक वारशाचा अमूल्य ठेवाही ठरतोय जीर्णोद्धाराची गरज! ​तासगावच्या गुरुवार पेठेतील श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिराचा समृद्ध इतिहास व धार्मिक परंपरा | मा. संजय काटकर (IAS) यांचा उपजिल्हा रुग्णालय, कवठेमहांकाळ येथे संवाद दौरा; ग्रामीण आरोग्य सेवांना गती देण्याचे निर्देश | जिल्हा सत्र,वरिष्ठ दिवाणी न्यायालयासाठी कवठे महांकाळ वकील संघटना आक्रमक.उपोषणाचा इशारा |