ईश्वरपूर शहरातील हॉटेल चालकांकडून अन्न सुरक्षेचे नियम धाब्यावर

👤 राहुल टिबे सांगली | 📅 16 June 2026 | 👁 369 Views
ईश्वरपूर शहरातील हॉटेल चालकांकडून अन्न सुरक्षेचे नियम धाब्यावर
ईश्वरपूर शहरातील हॉटेल चालकांकडून अन्न सुरक्षेचे नियम धाब्यावर
आजकाल लोकांमध्ये गरजेनुसार किंवा जिभेचे चोचले पुरवण्यासाठी हॉटेलमध्ये नाश्ता आणि जेवण करण्याचे प्रमाण खूप वाढले आहे. लोक हॉटेल्स मध्ये जातात आणि मोठ्या चवीने येथील अन्नपदार्थ वर ताव मारतात. तिथे गेल्यानंतर आपल्याला आपल्या टेबलवरच मेनू कार्ड आणून दिलं जातं त्यामध्ये आपण आपल्या आवडीचे पदार्थ ऑर्डर करतो. त्यानुसार तो माणूस किचन मध्ये जाऊन ती ऑर्डर देतो. त्यानंतर थोड्यावेळाने वेटर आपल्या टेबलवर ते सर्व आणून देतो. तो वेटर वाढतो किंवा आपण स्वतः हाताने वाढून घेतो. परंतु जवळपास सर्व हॉटेल्स मध्ये नागरिकांना किचनमध्ये जाण्यास मनाई असते. त्यामुळे तिथे बाजारातून आणलेले पदार्थ कसे ठेवले जातात कसे हाताळले जातात कशा प्रकारे शिजवले जातात याबाबत लोकांना काहीचं कळत नाही. त्यामुळे लोकांना बरेचदा पोट बिघडणं, उलटी होण अशा तब्येतीच्या तक्रारी जाणवतात. त्यामुळे आपल्याला स्वच्छ आणि सुरक्षित अन्न मिळणं हा आपला अधिकार आहे आणि त्यासाठी अन्नजन्य आजार टाळायचे असतील तर हॉटेल चालकांनी हे 4 नियम पाळावेच लागतील आणि त्यासाठी आपणही जागृत असलं पाहिजे

*पहिला नियम - स्वच्छता:* अन्नाला हात लावण्याआधी आणि नंतर कमीत कमी 20 सेकंद कोमट पाणी आणि साबणाने हात धुवा. कटिंग बोर्ड, किचनचा ओटा, भांडी रोज गरम पाणी आणि साबणाने स्वच्छ करा. फळं-भाज्या वाहत्या पाण्याखाली धुवा. पण लक्षात ठेवा - कच्चं मांस-मासे कधीच धुवू नका, त्याचे जंतू इकडे-तिकडे उडतात.

*दुसरा नियम - वेगळे ठेवा:* कच्चं मांस, चिकन, मासे आणि शिजवलेलं अन्न, फळं-भाज्या वेगळ्या ठेवा. कच्च्या आणि शिजवलेल्या पदार्थांसाठी वेगवेगळे चॉपिंग बोर्ड आणि चाकू वापरा. ज्या ताटात कच्चं मांस ठेवलं होतं, त्याच ताटात शिजवलेलं अन्न कधीच वाढू नका.

*तिसरा नियम - नीट शिजवा:* जंतू मारण्यासाठी अन्न योग्य तापमानापर्यंत शिजणं गरजेचं आहे. कीमा 160°F म्हणजे 71°C, तर चिकन 165°F म्हणजे 74°C पर्यंत आतून शिजलं पाहिजे. शंका असेल तर फूड थर्मामीटर वापरा.

*चौथा नियम - नीट थंड करा:* शिजवलेलं किंवा कापलेलं नाशवंत अन्न 2 तासांच्या आत फ्रीजमध्ये ठेवा. फ्रीजचं तापमान 40°F म्हणजे 4°C पेक्षा कमी आणि फ्रीझर 0°F म्हणजे -18°C ठेवा."
हे चार नियम सर्व हॉटेल चालक आणि मालकांनी पाळले तर ईश्वरपूर शहरवासीयांना स्वच्छ आणि सुरक्षित अन्न मिळू शकेल.
Weather
Stock Market
Live Cricket
LIVE
उरुण- ईश्वरपुर मध्ये MPSC विद्यार्थ्यांचा भव्य मोर्चा | मतदार यादी पुनरीक्षणाची प्रक्रिया निष्पक्ष, पारदर्शक व सर्वसमावेशक राबवावी- मतदार यादी निरीक्षक शीतल तेली-उगले | जतच्या पवनचक्क्यांमधील तारचोरीचा पर्दाफाश; एकाला अटक १४.७४ लाखांचा मुद्देमाल जप्त; सात चोरीचे गुन्हे उघडकीस | एसटी आरक्षणापासून नामकरणापर्यंत; विविध मागण्यांसाठी तासगावात धनगर समाज एकवटला : तासगाव तहसीलदारांना निवेदन; वीर शिंग्रोबा, अहिल्यादेवी होळकर यांच्या नावासह देवस्थानांच्या कारभारात पारदर्शकतेची मागणी | चोरीचे सोने विक्रीला आला अन् सांगली एलसीबी पोलिसांच्या जाळ्यात अडकला ४२ ग्रॅम सोन्याचे दागिने हस्तगत; ६ लाख ३० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त | शिक्षक दिनी आदर्श शिक्षक पुरस्कारासाठी श्री. घनश्याम सुभाष पाटील यांची निवड | चोरीचे सोने विकायला आला अन् सांगली एलसीबीच्या पोलिसांच्या हाती 'मुक्या "लागला; ‘मुक्या’कडून ६ लाखांचे दागिने जप्त | तासगावात उद्या सकाळी 10 वाजता रस्ता रोको सकल मराठा समाजाने पोलिसांना दिले निवेदन, | तासगाव-कवठेमहांकाळचे पालकत्व आमदार गोपीचंद पडळकरांकडे द्या; भाजप कार्यकर्त्यांची जोरदार मागणी | ईश्वरपूर शहरातील सिग्नल यंत्रणा धूळ खात! लाखो रुपयांचा चुराडा, विद्यार्थ्यांचा जीव धोक्यात |