ग्राहकांच्या संमतीशिवाय स्मार्ट मीटर बसवू नयेत : बसवराज पाटील

👤 सतीशकुमार पडोळकर | 📅 16 June 2026 | 👁 274 Views
ग्राहकांच्या संमतीशिवाय स्मार्ट मीटर बसवू नयेत : बसवराज पाटील
राज्यभर स्मार्ट मीटर बसविण्याची प्रक्रिया सुरू असताना ग्राहकांच्या संमतीशिवाय कोणत्याही घरावर किंवा आस्थापनावर स्मार्ट मीटर बसविण्यात येऊ नयेत, अशी ठाम भूमिका जनसुराज्य शक्ती पक्षाचे जत तालुका अध्यक्ष बसवराज पाटील यांनी मांडली आहे. तसेच जनतेमध्ये स्मार्ट मीटरबाबत जनजागृती करण्यासाठी जनसुराज्य शक्ती पक्षाच्या वतीने जत तालुकाभर जागृती मोहीम राबविण्यात येणार असल्याची माहिती त्यांनी दिली.
बसवराज पाटील म्हणाले की, स्मार्ट मीटरमुळे वीज ग्राहकांवर अतिरिक्त आर्थिक भार पडण्याची शक्यता असल्याची भावना अनेक नागरिकांमध्ये आहे. त्यामुळे शासन व वीज वितरण कंपनीने नागरिकांच्या शंका दूर करून पूर्ण माहिती द्यावी. ग्राहकांची स्पष्ट संमती घेतल्याशिवाय स्मार्ट मीटर बसविण्याची घाई करू नये.
राज्यभर स्मार्ट मीटर बसविण्याची प्रक्रिया सुरू असताना ग्राहकांच्या संमतीशिवाय कोणत्याही घरावर किंवा आस्थापनावर स्मार्ट मीटर बसविण्यात येऊ नयेत, अशी ठाम भूमिका जनसुराज्य शक्ती पक्षाचे जत तालुका अध्यक्ष बसवराज पाटील यांनी मांडली आहे.
याबाबत जनसुराज्य शक्ती पक्षाच्या कार्यकर्त्यांमार्फत गावोगावी बैठका, पत्रकांचे वाटप आणि नागरिकांशी संवाद साधून जागृती केली जाणार आहे. तसेच नागरिकांच्या तक्रारी व सूचना संबंधित प्रशासनापर्यंत पोहोचविण्यात येतील, असेही त्यांनी सांगितले.
"जनतेच्या हिताला बाधा येणार असेल तर जनसुराज्य शक्ती पक्ष रस्त्यावर उतरून लोकांच्या हक्कासाठी लढा देईल," असा इशाराही बसवराज पाटील यांनी दिला.
Weather
Stock Market
Live Cricket
LIVE
उरुण- ईश्वरपुर मध्ये MPSC विद्यार्थ्यांचा भव्य मोर्चा | मतदार यादी पुनरीक्षणाची प्रक्रिया निष्पक्ष, पारदर्शक व सर्वसमावेशक राबवावी- मतदार यादी निरीक्षक शीतल तेली-उगले | जतच्या पवनचक्क्यांमधील तारचोरीचा पर्दाफाश; एकाला अटक १४.७४ लाखांचा मुद्देमाल जप्त; सात चोरीचे गुन्हे उघडकीस | एसटी आरक्षणापासून नामकरणापर्यंत; विविध मागण्यांसाठी तासगावात धनगर समाज एकवटला : तासगाव तहसीलदारांना निवेदन; वीर शिंग्रोबा, अहिल्यादेवी होळकर यांच्या नावासह देवस्थानांच्या कारभारात पारदर्शकतेची मागणी | चोरीचे सोने विक्रीला आला अन् सांगली एलसीबी पोलिसांच्या जाळ्यात अडकला ४२ ग्रॅम सोन्याचे दागिने हस्तगत; ६ लाख ३० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त | शिक्षक दिनी आदर्श शिक्षक पुरस्कारासाठी श्री. घनश्याम सुभाष पाटील यांची निवड | चोरीचे सोने विकायला आला अन् सांगली एलसीबीच्या पोलिसांच्या हाती 'मुक्या "लागला; ‘मुक्या’कडून ६ लाखांचे दागिने जप्त | तासगावात उद्या सकाळी 10 वाजता रस्ता रोको सकल मराठा समाजाने पोलिसांना दिले निवेदन, | तासगाव-कवठेमहांकाळचे पालकत्व आमदार गोपीचंद पडळकरांकडे द्या; भाजप कार्यकर्त्यांची जोरदार मागणी | ईश्वरपूर शहरातील सिग्नल यंत्रणा धूळ खात! लाखो रुपयांचा चुराडा, विद्यार्थ्यांचा जीव धोक्यात |