आचरा गावातील बंद सीसीटीव्ही कॅमेरे तातडीने सुरू करा; अन्यथा १५ ऑगस्टला तीव्र आंदोलनाचा इशारा

👤 तुषार शिंगाडे सिंधुदुर्ग | 📅 02 August 2026 | 👁 35 Views
आचरा गावातील बंद सीसीटीव्ही कॅमेरे तातडीने सुरू करा; अन्यथा १५ ऑगस्टला तीव्र आंदोलनाचा इशारा
रुपम टेमकर आणि सहका-यांनी वेधले निवेदनाद्वारे पोलीस आणि ग्रामपंचायतीचे लक्ष
आचरा गावातील सार्वजनिक सुरक्षेसाठी बसविण्यात आलेले सीसीटीव्ही कॅमेरे अनेक महिन्यांपासून बंद असल्याने कायदा व सुव्यवस्था, गुन्हे प्रतिबंध आणि नागरिकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. हे कॅमेरे तात्काळ सुरू करावेत, अन्यथा १५ ऑगस्ट रोजी लोकशाही मार्गाने तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा ग्रामस्थांनी ग्रामपंचायत आणि आचरा पोलिस ठाण्याला दिलेल्या निवेदनातून दिला आहे.
निवेदनात नमूद केल्याप्रमाणे, गावातील सीसीटीव्ही कॅमेरे बंद असल्यामुळे ग्रामस्थांमध्ये तीव्र नाराजी असून, वीज बिल न भरल्यामुळे कॅमेरे बंद असल्याची माहिती समोर येत आहे. ही बाब खरी असल्यास संबंधित जबाबदार अधिकारी किंवा व्यक्तींवर योग्य ती कारवाई करावी, अशी मागणी करण्यात आली आहे.
यापूर्वीही यासंदर्भात पोलीस अधीक्षक व जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देऊन कळविण्यात आले होते. मात्र, अद्यापही सीसीटीव्ही यंत्रणा सुरू करण्यात आलेली नसल्याचे ग्रामस्थांनी म्हटले आहे.
तसेच, निवेदनाद्वारे सीसीटीव्ही कॅमेरे बंद असण्याचे नेमके कारण, त्यासाठी जबाबदार अधिकारी किंवा व्यक्ती कोण, कॅमेरे नेमक्या कोणत्या तारखेपर्यंत सुरू होणार आणि भविष्यात अशी परिस्थिती टाळण्यासाठी कोणती उपाययोजना करण्यात येणार, याबाबत लेखी माहिती देण्याची मागणी करण्यात आली आहे.
१५ ऑगस्ट २०२६ पर्यंत गावातील सर्व सीसीटीव्ही कॅमेरे सुरू न झाल्यास स्वातंत्र्यदिनाच्या दिवशी लोकशाही मार्गाने आंदोलन करण्यात येईल. आंदोलनाची वेळ, ठिकाण व स्वरूप याची माहिती योग्य वेळी जाहीर करण्यात येणार असल्याचे निवेदनात स्पष्ट करण्यात आले आहे. सदर निवेदन आचरा ग्रामविकास अधिकारी पद्माकर कासले यांना देण्यात आले.
यावेळी रूपेश टेमकर,अनिकेत पांगे,शैलेश सारंग,निलेश घाडी,प्रज्ञेश आचरेकर,गणेश पाटकर,दर्पण आचरेकर ,चिन्मय वस्त ,रोहित भिरंवडेकर ,गौरव पेडणेकर,राकेश यादव,प्रथमेश कांबळी, बंडू पवार आदी ग्रामस्थ उपस्थित होते.


Weather
Stock Market
Live Cricket
LIVE
ऊसतोड कामगाराचा मुलगा ते शिवछत्रपती पुरस्कार विजेता; शंकर गदईंचा प्रेरणादायी प्रवास विद्यार्थ्यांसमोर | आचरा गावातील बंद सीसीटीव्ही कॅमेरे तातडीने सुरू करा; अन्यथा १५ ऑगस्टला तीव्र आंदोलनाचा इशारा | मालवण बंदरा येथील पोर्टा केबिनचे पालकमंत्री नितेश राणे यांच्या हस्ते उद्घाटन | प्रशासनाने अधिक गतीने काम करत शासनाच्या सेवा नागरिकांपर्यंत पोहचवाव्यात पालकमंत्री नितेश राणे | भगवान गौतम बुद्ध हेच खरे विश्वगुरू जानवलीच्या बुद्ध विहारात आषाढी पौर्णिमेचा प्रारंभ दिन कार्यक्रम | प्रवासी हेच आपले दैवत"हे ब्रीद अंगिकारुन संतोष भाट यांनी एसटी गाड्यांच्या दुरुस्तीचे काम अत्यंत चोख आणि जबाबदारीने पार पाडले - श्रीनिवास कदम | महसूल विभाग हा शासन आणि जनतेमधील विश्वासाचा मजबूत दुवा पालकमंत्री नितेश राणे | आगाऊ धान्य वितरणाच्या निर्णयाचा पालकमंत्री नितेश राणे यांनी घेतला सखोल आढावा | पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी वृक्ष लागवड आवश्यक .. | अणुऊर्जा प्रकल्पाला स्थानिकांचा ठाम विरोध असताना तो मोडून काढण्यासाठी राज्य सरकार ,प्रशासन आणि पोलीस यंत्रणेचा गैरवापर करत आहेत |