देवगडमध्ये यंदापासून बी.एस्सी. नर्सिंग महाविद्यालय सुरू ग्रामीण विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणाची नवी संधी; आमदार प्रमोदजी जठार यांच्या प्रयत्नांना यश

👤 तुषार शिंगाडे | 📅 20 August 2026 | 👁 8 Views
देवगडमध्ये यंदापासून बी.एस्सी. नर्सिंग महाविद्यालय सुरू

ग्रामीण विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणाची नवी संधी; आमदार प्रमोदजी जठार यांच्या प्रयत्नांना यश

देवगड, जामसंडे : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना दर्जेदार व उच्च शिक्षणाची संधी आपल्या परिसरातच उपलब्ध व्हावी, या उद्देशाने सुनीता शांताराम एज्युकेशन ट्रस्टच्या माध्यमातून निळकंठ श्रीधर तथा बाळासाहेब दीक्षित बी.एस्सी. नर्सिंग महाविद्यालय, जामसंडे, देवगड हे नवीन महाविद्यालय यावर्षीपासून सुरू होत आहे. या महाविद्यालयाला २०२६-२७ या शैक्षणिक वर्षापासून बी.एस्सी. नर्सिंग अभ्यासक्रमासाठी परवानगी प्राप्त झाली आहे.

या शैक्षणिक उपक्रमामागे मा. आमदार प्रमोदजी जठार यांची ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणाच्या अधिकाधिक संधी उपलब्ध करून देण्याची भूमिका आहे. देवगड व सिंधुदुर्गातील विद्यार्थ्यांना नर्सिंगसारख्या रोजगाराभिमुख आणि सेवाभावी क्षेत्रातील पदवीचे शिक्षण घेण्यासाठी मोठ्या शहरांकडे जाण्याची गरज कमी व्हावी, तसेच स्थानिक पातळीवर सक्षम मनुष्यबळ निर्माण व्हावे, यासाठी या महाविद्यालयाची उभारणी करण्यात आली आहे.

सुनीता शांताराम एज्युकेशन ट्रस्टच्या माध्यमातून यापूर्वीपासूनच मुकुंदराव फाटक नर्सिंग कॉलेजमध्ये जी.एन.एम. (GNM) अभ्यासक्रम यशस्वीपणे सुरू आहे. या संस्थेच्या माध्यमातून नर्सिंग शिक्षणाचा अनुभव आणि पायाभूत सुविधा विकसित केल्यानंतर आता बी.एस्सी. नर्सिंगच्या पदवी अभ्यासक्रमाची सुरुवात करण्यात आली आहे.

नवीन बी.एस्सी. नर्सिंग महाविद्यालयात चार वर्षांचा पदवी अभ्यासक्रम असून, विद्यार्थ्यांना आधुनिक प्रयोगशाळा, कौशल्य प्रशिक्षण, सुसज्ज वर्गखोल्या, ग्रंथालय व ई-लायब्ररी, संगणक सुविधा, स्मार्ट क्लासरूम, व्यक्तिमत्त्व विकास व इतर शैक्षणिक सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. विद्यार्थ्यांना केवळ पुस्तकी ज्ञान न देता प्रत्यक्ष नर्सिंग कौशल्य, रुग्णसेवा, शिस्त, संवेदनशीलता आणि मानवतावादी दृष्टिकोन यांचा विकास करण्यावर भर देण्यात येणार आहे.

ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसाठी हे महाविद्यालय आरोग्य क्षेत्रातील उच्च शिक्षणाचे महत्त्वाचे केंद्र ठरण्याची अपेक्षा आहे. विशेषतः देवगड व सिंधुदुर्ग परिसरातील विद्यार्थ्यांना आपल्या घराजवळच दर्जेदार नर्सिंग शिक्षण घेण्याची संधी यामुळे उपलब्ध होणार आहे.

२०२६-२७ या शैक्षणिक वर्षासाठी बी.एस्सी. नर्सिंग प्रवेश प्रक्रिया सुरू करण्यात आली असून, इच्छुक व पात्र विद्यार्थ्यांनी अधिक माहितीसाठी महाविद्यालयाशी संपर्क साधावा, असे आवाहन संस्थेच्या वतीने करण्यात आले आहे.

निळकंठ श्रीधर तथा बाळासाहेब दीक्षित बी.एस्सी. नर्सिंग महाविद्यालय
जामसंडे, देवगड, जिल्हा सिंधुदुर्ग – ४१६६१२
संपर्क : ८६६८७५४०४५
Weather
Stock Market
Live Cricket
LIVE
देवगडमध्ये यंदापासून बी.एस्सी. नर्सिंग महाविद्यालय सुरू ग्रामीण विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणाची नवी संधी; आमदार प्रमोदजी जठार यांच्या प्रयत्नांना यश | मिरज-पंढरपूर महामार्गावर ३०० किलो गांजा जप्त; १ कोटी ७५ लाखांचा मुद्देमाल हस्तगत | केसरेकर दाम्पत्य हत्याकांडाविरोधात शिवसेना (उ बा ठा ) चा आवाज; शनिवारी तासगाव बंदची हाक | कुपवाड दुहेरी हत्याकांडाच्या निषेधार्थ दि २२ ऑगस्ट - शनिवारच्या तासगाव बंदला मुस्लिम समाजाचा जाहीर पाठिंबा | कलमठमधील श्री विठ्ठल रखुमाई मंदिरात २३ पासून हरिनाम सप्ताह | कै. श्रीकांत सांबारी अष्टपैलू समाजसेवक पुरस्कार’ २०२६ श्रीमती वंदना करंबेळकर यांना जाहीर | राजे रामराव महाविद्यालयात शाश्वत ऊर्जा उपायांसाठी कार्यक्षम पदार्थांच्या प्रगत संश्लेषण पद्धती विषयावर आंतरराष्ट्रीय कार्यशाळा | राजे रामराव महाविद्यालयात शाश्वत ऊर्जा उपायांसाठी कार्यक्षम पदार्थांच्या प्रगत संश्लेषण पद्धती विषयावर आंतरराष्ट्रीय कार्यशाळा | तासगावातील सार्वजनिक शौचालयांची दुरवस्था; स्वच्छता अन् स्ट्रीट लाईटसाठी नागरिकांचा दोन दिवसांचा अल्टिमेट, अन्यथा आंदोलनाचा इशारा | कुपवाडमधील केसरेकर दाम्पत्य हत्याकांडाचे तीव्र पडसाद: दि. २१ रोजी 'सांगली-कुपवाड बंद'ची हाक; निषेध मोर्चाचे आयोजन आमदार गोपीचंद पडळकर |