कुपवाडमधील केसरेकर दाम्पत्य हत्याकांडाचे तीव्र पडसाद: दि. २१ रोजी 'सांगली-कुपवाड बंद'ची हाक; निषेध मोर्चाचे आयोजन आमदार गोपीचंद पडळकर

👤 संतोष एडके तासगाव | 📅 19 August 2026 | 👁 3 Views
कुपवाडमधील केसरेकर दाम्पत्य हत्याकांडाचे तीव्र पडसाद: दि. २१ रोजी 'सांगली-कुपवाड बंद'ची हाक; निषेध मोर्चाचे आयोजन  आमदार गोपीचंद पडळकर



सांगली -कुपवाड येथील विघ्नहर्ता शांती कॉलनी परिसरात घरासमोर कचरा टाकण्याच्या किरकोळ वादातून केसरेकर दांपत्याच्या हत्याप्रकरणी संपूर्ण सांगली जिल्ह्यात तीव्र पडसाद उमटत आहेत. या हत्याकांडाच्या निषेधार्थ २१ तारखेला भव्य मोर्चाचे आयोजन करण्यात आले असून सांगली-कुपवाड शहर बंदची हाक देण्यात आली आहे.

​घटनेची पार्श्वभूमी:
शनिवारी (१५ ऑगस्ट) सकाळी कुपवाडमधील विघ्नहर्ता शांती कॉलनी येथे घरासमोर कचरा टाकण्याच्या कारणावरून आरोपी फरीद अब्दुल शेख (वय ५२) आणि केसरेकर कुटुंबियांमध्ये वाद झाला. या वादाचे रूपांतर भांडणात झाल्यानंतर आरोपीने घरातून हातोडा व चाकू आणून मोहन नागाप्पा केसरेकर (वय ४५) यांच्या डोक्यात हातोड्याने प्रहार केला, तर मनीषा मोहन केसरेकर (वय ३५) यांच्या पोटात चाकूने वार केले.
​उपचारादरम्यान गंभीर जखमी झालेल्या मनीषा केसरेकर यांचा मृत्यू झाला, तर
मोहन केसरेकर हे गंभीर जखमी होते उपचारादरम्यान त्यांचा बुधवारी मृत्यू झाला याप्रकरणी एमआयडीसी कुपवाड पोलीस ठाण्यात आरोपीविरुद्ध भारतीय न्याय संहितेच्या विविध कलमांनुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून, स्थानिकांनी तसेच पोलिसांनी तत्परता दाखवत आरोपी फरीद शेख याला दोन तासांत जेरबंद केले आहे.
​निषेध आणि बंदची हाक:
या घटनेमुळे नागरिकांमध्ये प्रचंड संतापाची लाट पसरली आहे. घटनेचा तीव्र निषेध नोंदवण्यासाठी २१ तारखेला सर्वधर्मीय व नागरिक एकत्र येत निषेध मोर्चा काढणार असून संपूर्ण सांगली-कुपवाड शहर बंद ठेवण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
​आमदार गोपीचंद पडळकर यांची मागणी:
आमदार गोपीचंद पडळकर यांनी या प्रकरणावर प्रतिक्रिया देत प्रशासनाकडे खालील प्रमुख मागण्या केल्या आहेत:
​हे प्रकरण तात्काळ 'फास्ट ट्रॅक कोर्टात' चालवले जावे.
​पीडित पक्षाला न्याय मिळण्यासाठी विशेष सरकारी वकील नियुक्त करावा.
​पीडित कुटुंबाजवळील निष्पाप मुलांना तातडीने कडक पोलीस संरक्षण देण्यात यावे.
Weather
Stock Market
Live Cricket
LIVE
राजे रामराव महाविद्यालयात शाश्वत ऊर्जा उपायांसाठी कार्यक्षम पदार्थांच्या प्रगत संश्लेषण पद्धती विषयावर आंतरराष्ट्रीय कार्यशाळा | राजे रामराव महाविद्यालयात शाश्वत ऊर्जा उपायांसाठी कार्यक्षम पदार्थांच्या प्रगत संश्लेषण पद्धती विषयावर आंतरराष्ट्रीय कार्यशाळा | तासगावातील सार्वजनिक शौचालयांची दुरवस्था; स्वच्छता अन् स्ट्रीट लाईटसाठी नागरिकांचा दोन दिवसांचा अल्टिमेट, अन्यथा आंदोलनाचा इशारा | कुपवाडमधील केसरेकर दाम्पत्य हत्याकांडाचे तीव्र पडसाद: दि. २१ रोजी 'सांगली-कुपवाड बंद'ची हाक; निषेध मोर्चाचे आयोजन आमदार गोपीचंद पडळकर | सांगलीत शुक्रवारी ‘महावॉकेथॉन २०२६’ ‘वॉक फॉर वॉटर’मध्ये नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे : जिल्हाधिकारी डॉ. मैनाक घोष | सांगोला तालुक्यातील नाझरे परिसरामधील अवैध धंद्यांमध्ये वाढ , तरुण वर्ग व्यसनाच्या आहारी ग्रामस्थांचा कारवाईचा आग्रह | कणकवलीतील जुगार कारवाईवर पालकमंत्री नितेश राणेंचा थेट इशारा; ‘ संशयित आरोपींना मदत करणारे एकही अधिकारी-कर्मचारी सुटणार नाही’ | सांगली एलसीबीची धडाकेबाज कारवाई; खूनाच्या गुन्ह्यातील आरोपी अवघ्या दोन तासांत जेरबंद | असलदे पोलीस पाटील पदाचा अतिरिक्त कार्यभार नांदगावच्या पोलीस पाटलांकडे तहसीलदार दीक्षांत देशपांडे यांचे आदेश; | नागपंचमीच्या पार्श्वभूमीवर तळेरे बाजारपेठेत नागमूर्त्या दाखल; चाकरमान्यांचीही गावाकडे लगबग |