केसरेकर दाम्पत्य हत्याकांडाविरोधात शिवसेना (उ बा ठा ) चा आवाज; शनिवारी तासगाव बंदची हाक
👤 संतोष एडके तासगाव |
📅
20 August 2026 |
👁 1 Views
तासगाव : कुपवाड येथील केसरेकर दाम्पत्याच्या दुहेरी हत्याकांडाने तासगावसह परिसरात संतापाची भावना निर्माण झाली आहे. या हत्याकांडातील आरोपीला लवकरात लवकर कठोर शिक्षा व्हावी आणि पीडित कुटुंबाला न्याय मिळावा, या मागणीसाठी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटाच्या वतीने शनिवार, दि. २२ ऑगस्ट रोजी तासगाव बंदची हाक देण्यात आली आहे. याबाबतचे निवेदन तासगाव पोलीस प्रशासनाला देण्यात आले.
दि. १५ ऑगस्ट रोजी कुपवाड येथे घडलेल्या केसरेकर दाम्पत्याच्या हत्याकांडामुळे परिसरात संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे. या घटनेतील आरोपीवर कठोरात कठोर कारवाई करून न्यायालयीन प्रक्रिया जलदगतीने पूर्ण करावी आणि दोष सिद्ध झाल्यास आरोपीला फाशीची शिक्षा द्यावी, अशी मागणी शिवसेना उबाठा गटाच्या वतीने करण्यात आली आहे.
पीडित कुटुंबाला न्याय मिळावा तसेच भविष्यात अशा गंभीर घटनांना आळा बसावा, यासाठी तासगाव शहरातील नागरिकांनी शनिवारीच्या बंदमध्ये सहभागी व्हावे, असे आवाहन शिवसेना उबाठा गटाच्या वतीने करण्यात आले आहे.
दरम्यान, तासगाव बंदची माहिती पोलीस प्रशासनाला देण्यात आली असून, बंददरम्यान कायदा व सुव्यवस्था अबाधित राहण्यासाठी आवश्यक ती कार्यवाही करण्याची मागणी निवेदनातून करण्यात आली आहे.
केसरेकर दाम्पत्य हत्याकांडातील आरोपीवर कठोर कारवाई होईपर्यंत या प्रकरणाचा पाठपुरावा सुरू ठेवण्याचा निर्धार शिवसेना उबाठा गटाच्या पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केला आहे. पीडित कुटुंबाला न्याय मिळावा आणि दोषींना कायद्यानुसार कठोर शिक्षा व्हावी, यासाठी नागरिकांनी एकजुटीने आवाज उठवावा, असे आवाहनही करण्यात आले आहे.