भगवान गौतम बुद्ध हेच खरे विश्वगुरू जानवलीच्या बुद्ध विहारात आषाढी पौर्णिमेचा प्रारंभ दिन कार्यक्रम

👤 तुषार शिंगाडे सिंधुदुर्ग | 📅 02 August 2026 | 👁 22 Views
भगवान गौतम बुद्ध हेच खरे विश्वगुरू जानवलीच्या बुद्ध विहारात आषाढी पौर्णिमेचा प्रारंभ दिन कार्यक्रम
तथागत गौतम बुद्धाने सांगितलेल्या मार्गाचे पालन करून जगातील लोक दु:ख मुक्त होत आहेत. त्यामुळेच गौतम बुद्ध हेच खºया अर्थाने विश्वगुरू आहेत, असे मत भारतीय बौद्ध महासभेच्या सिंधुदुर्गचे जिल्हाध्यक्ष आनंद कासार्डेकर यांनी व्यक्त केले.
भारतीय बौद्ध महासभा जिल्हा शाखा, महिला शाखा, समता सैनिक दल, कणकवली तालुका शाखा यांच्या वतीने जानवलीच्या बुद्ध विहारात आषाढी पौर्णिमेचा प्रारंभ दिन कार्यक्रम झाला. याप्रसंगी श्री. कासार्डेकर बोलत होते. यावेळी समता दलाचे उपाध्यक्ष दिलीप तरंदळेकर, संजय कांबळे, संस्कार विभागाचे सचिव दीपक कांबळे, पर्यटन विभागाचे सचिव सुभाष जाधव, तालुका सचिव महेंद्र कदम, कोषाध्यक्ष प्रकाश कांबळे , महासंघाच्या महिला जिल्हाध्यक्षा प्रा. सुषमा हरकुळकर, सरपंच अजित पवार, जेनीकुमार कांबळे, विजय हरकुलकर, गोपी पवार, बाळा डांगमोडेकर, दीपक कदम, शंकर कदम यांच्यासह गाव शाखेतील बहुसंख्य महिला व पदाधिकारी उपस्थित होते .
आषाढी पौर्णिमेला बोधिसत्व चित्ताचे महामायेच्या उदरी संसाराने केले म्हणून त्याला गर्भ मंगल दिन म्हणतात. तसेच महाभिनिक्ष्क्रमण दिन, धम्मचक्र प्रवर्तन दिन, संघाची स्थापना, वषार्वास प्रारंभ दिन अशा विषयांवर श्री. कासार्डेकर यांनी प्रवचनातून मार्गदर्शन केले. सूत्रसंचालन जिल्हा सचिव संजय पेंदुरकर यांनी केले.
फोटो
Weather
Stock Market
Live Cricket
LIVE
ऊसतोड कामगाराचा मुलगा ते शिवछत्रपती पुरस्कार विजेता; शंकर गदईंचा प्रेरणादायी प्रवास विद्यार्थ्यांसमोर | आचरा गावातील बंद सीसीटीव्ही कॅमेरे तातडीने सुरू करा; अन्यथा १५ ऑगस्टला तीव्र आंदोलनाचा इशारा | मालवण बंदरा येथील पोर्टा केबिनचे पालकमंत्री नितेश राणे यांच्या हस्ते उद्घाटन | प्रशासनाने अधिक गतीने काम करत शासनाच्या सेवा नागरिकांपर्यंत पोहचवाव्यात पालकमंत्री नितेश राणे | भगवान गौतम बुद्ध हेच खरे विश्वगुरू जानवलीच्या बुद्ध विहारात आषाढी पौर्णिमेचा प्रारंभ दिन कार्यक्रम | प्रवासी हेच आपले दैवत"हे ब्रीद अंगिकारुन संतोष भाट यांनी एसटी गाड्यांच्या दुरुस्तीचे काम अत्यंत चोख आणि जबाबदारीने पार पाडले - श्रीनिवास कदम | महसूल विभाग हा शासन आणि जनतेमधील विश्वासाचा मजबूत दुवा पालकमंत्री नितेश राणे | आगाऊ धान्य वितरणाच्या निर्णयाचा पालकमंत्री नितेश राणे यांनी घेतला सखोल आढावा | पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी वृक्ष लागवड आवश्यक .. | अणुऊर्जा प्रकल्पाला स्थानिकांचा ठाम विरोध असताना तो मोडून काढण्यासाठी राज्य सरकार ,प्रशासन आणि पोलीस यंत्रणेचा गैरवापर करत आहेत |