मालवण बंदरा येथील पोर्टा केबिनचे पालकमंत्री नितेश राणे यांच्या हस्ते उद्घाटन

👤 तुषार शिंगाडे सिंधुदुर्ग | 📅 02 August 2026 | 👁 58 Views
मालवण बंदरा येथील पोर्टा केबिनचे पालकमंत्री नितेश राणे यांच्या हस्ते उद्घाटन
सागरी सुरक्षेच्या दृष्टीने देखरेख ठेवण्याच्या दृष्टीने पोर्टा केबिन उपयुक्त
मालवण बंदर (जेट्टी) येथील सागरी गस्ती केंद्राच्या पोर्टा केबिनचे उद्घाटन मत्स्यव्यवसाय व बंदरे मंत्री तथा सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री नितेश राणे यांच्या हस्ते फित कापून करण्यात आले. यावेळी आमदार निलेश राणे यांची प्रमुख उपस्थिती होती. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील हे पहिले पोर्टा केबिन असून यापुढे जिल्ह्यातील १४ संवेदनशील ठिकाणी पोर्टा केबिन बसवण्यात येणार आहेत.
यावेळी जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे, पोलीस अधीक्षक डॉ.मोहन दहिकर, अपर पोलीस अधीक्षक नयोमी साटम, सागरी सुरक्षा शाखेचे पोलीस निरीक्षक राजेंद्र मगदूम तसेच पोलीस विभागाचे अन्य अधिकारी उपस्थित होते.

मालवण बंदर हे संवेदनशील लँडिंग पॉईंट असून या ठिकाणी बोटींची ये - जा मोठ्या प्रमाणात सुरु असते. तसेच या ठिकाणी अनेक पर्यटक भेट देत असतात. त्यामुळे सागरी सुरक्षेच्या दृष्टीने सागरी भागावर देखरेख ठेवण्यासाठी आणि सतर्कता निर्माण करण्याच्या दृष्टीने पोलीस प्रशिक्षित मरीन होमगार्ड व सुरक्षा वॉर्डन यांच्यासाठी मालवण बंदर येथे पोर्टा केबिन बसवण्यात आले आहे.
Weather
Stock Market
Live Cricket
LIVE
ऊसतोड कामगाराचा मुलगा ते शिवछत्रपती पुरस्कार विजेता; शंकर गदईंचा प्रेरणादायी प्रवास विद्यार्थ्यांसमोर | आचरा गावातील बंद सीसीटीव्ही कॅमेरे तातडीने सुरू करा; अन्यथा १५ ऑगस्टला तीव्र आंदोलनाचा इशारा | मालवण बंदरा येथील पोर्टा केबिनचे पालकमंत्री नितेश राणे यांच्या हस्ते उद्घाटन | प्रशासनाने अधिक गतीने काम करत शासनाच्या सेवा नागरिकांपर्यंत पोहचवाव्यात पालकमंत्री नितेश राणे | भगवान गौतम बुद्ध हेच खरे विश्वगुरू जानवलीच्या बुद्ध विहारात आषाढी पौर्णिमेचा प्रारंभ दिन कार्यक्रम | प्रवासी हेच आपले दैवत"हे ब्रीद अंगिकारुन संतोष भाट यांनी एसटी गाड्यांच्या दुरुस्तीचे काम अत्यंत चोख आणि जबाबदारीने पार पाडले - श्रीनिवास कदम | महसूल विभाग हा शासन आणि जनतेमधील विश्वासाचा मजबूत दुवा पालकमंत्री नितेश राणे | आगाऊ धान्य वितरणाच्या निर्णयाचा पालकमंत्री नितेश राणे यांनी घेतला सखोल आढावा | पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी वृक्ष लागवड आवश्यक .. | अणुऊर्जा प्रकल्पाला स्थानिकांचा ठाम विरोध असताना तो मोडून काढण्यासाठी राज्य सरकार ,प्रशासन आणि पोलीस यंत्रणेचा गैरवापर करत आहेत |