पुराच्या पाण्यात वाहून गेल्याने करुळ येथील शेतकरी बेपत्ता

👤 तुषार शिंगाडे सिंधुदुर्ग | 📅 28 July 2026 | 👁 42 Views
पुराच्या पाण्यात वाहून गेल्याने करुळ येथील शेतकरी बेपत्ता
सह्याद्री जीव रक्षक टीमचे ४० युवक शोधमोहिमेत; पोलीस व महसूल अधिकारी घटनास्थळी
करुळ गावठण ब येथील शेतकरी सदानंद हरिश्चंद्र कदम (वय ६०) हे पुराच्या पाण्यात वाहून गेल्याची दुर्दैवी घटना आज सकाळी घडली. कामानिमित्त शेतात जात असताना नदीतील पाण्याचा अंदाज न आल्याने ही दुर्घटना घडली. या घटनेमुळे करुळ परिसरासह संपूर्ण तालुक्यात हळहळ व्यक्त होत आहे. सदानंद कदम हे आज सकाळी घरातून खत व कोयता घेऊन आपल्या शेतात जात होते. घरापासून काही अंतरावर नदीकाठाजवळ त्यांचा पाय घसरला. नदीला मोठ्या प्रमाणात पाणी असल्याने ते पुराच्या प्रवाहात वाहून गेले. घटनेची माहिती मिळताच वैभववाडी पोलीस तातडीने घटनास्थळी दाखल झाले. तसेच महसूल विभागाचे अधिकारीही घटनास्थळी पोहोचले असून, नदीपात्रात युद्धपातळीवर शोधमोहीम सुरू करण्यात आली आहे. करुळ गावातील सह्याद्री जीव रक्षक टीमचे सुमारे ४० युवक सदानंद कदम यांचा शोध घेण्यासाठी नदीपात्रात उतरले आहेत. नदीतील पाण्याचा प्रवाह वेगवान असल्याने शोधकार्यात अडथळे येत असले तरी त्यांचा शोध घेण्यासाठी युद्धपातळीवर प्रयत्न सुरू आहेत.
Weather
Stock Market
Live Cricket
LIVE
ठेकेदारांना अभय, नागरिकांना त्रास' | पीक विम्यात देवगडच्या शेतकऱ्यांवर अन्याय; कृषी अधिकाऱ्यांना सभागृहात धारेवर | वाहून गेलेल्या शेतकऱ्याचा तब्बल आठ तासाने मिळाला मृतदेह..... | पुराच्या पाण्यात वाहून गेल्याने करुळ येथील शेतकरी बेपत्ता | ओटभरणी समारंभात रुजवले संस्कारांचे बीज! | अनुसयामाता विश्रांतीधाम आश्रमात गुरुपौर्णिमा उत्सव | नगराध्यक्ष यु. टी. जाधव यांनी पारावर ज्येष्ठ नागरिकांची घेतली भेट; विकासकामांवर साधला संवाद | 'माणुसकीचा रेनकोट' : विश्वनायक फाउंडेशनकडून सिग्नलवरील गरजू बालक, महिला व वृद्धांना पावसाळी रेनकोटचे मोफत वाटप | सांगलीत 500+ पदांसाठी भव्य रोजगार मेळावा! 30 जुलैला 19 कंपन्यांची भरती | पत्रकार अक्षय यादव यांना ‘महाराष्ट्र जनगौरव पुरस्कार–२०२५’ने गौरविण्यात आले |