अनुसयामाता विश्रांतीधाम आश्रमात गुरुपौर्णिमा उत्सव

👤 तुषार शिंगाडे सिंधुदुर्ग | 📅 28 July 2026 | 👁 152 Views
कणकवली : शहरातील प. पू. नियादेवी अनुसयामाता विश्रांतीधाम आश्रम येथे बुधवार २९ जुलै रोजी गुरुपौर्णिमा उत्सव साजरा होणार आहे. यानिमित्त विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
सकाळी १० वा. प. पू. भालचंद्र महाराज, फलाहारी बाबांच्या पादुकांचे पूजन, ११ वा. प. पू. देवी अनुसया माता यांच्या समाधीचे पूजन, दुपारी १२ वा. भजन, १ वा. आरती, तीर्थप्रसाद, १.३० वा. महाप्रसाद, सायंकाळी प. पू. देवी अनुसया माता विश्रांती धाम महिला मंडळाचे भजन, रात्री ८.३० वा. शेज आरती होईल. तरी भाविकांनी या उत्सवात सहभागी व्हावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

कलमठ-बिडयेवाडीत गुरुपौर्णिमा उत्सव
कणकवली : कलमठ बिडयेवाडी येथील श्री स्वामी समर्थ मंदिरात बुधवार २९ रोजी गुरुपौर्णिमा उत्सव साजरा केला जाणार आहे. यानिमित्त विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. सकाळी ८ वा. पूजा, अभिषेक, लघरुद्र, लघुयाग व धार्मिक कार्यक्रम, दुपारी १२.३० वा. धुप आरती, सायंकाळी ५.३० वा. बिडयेवाडीतील १० व १२ वीच्या परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा, सायंकाळी ७ वा. भजन, रात्री ८ वा. स्वामी समर्थांचे नामस्मरण, आरती होईल. तरी भाविकांनी या उत्सवात सहभागी व्हावे, असे आवाहन श्री स्वामी समर्थ मंदिराच्या सेवेकरांनी केले आहे.
Weather
Stock Market
Live Cricket
LIVE
ठेकेदारांना अभय, नागरिकांना त्रास' | पीक विम्यात देवगडच्या शेतकऱ्यांवर अन्याय; कृषी अधिकाऱ्यांना सभागृहात धारेवर | वाहून गेलेल्या शेतकऱ्याचा तब्बल आठ तासाने मिळाला मृतदेह..... | पुराच्या पाण्यात वाहून गेल्याने करुळ येथील शेतकरी बेपत्ता | ओटभरणी समारंभात रुजवले संस्कारांचे बीज! | अनुसयामाता विश्रांतीधाम आश्रमात गुरुपौर्णिमा उत्सव | नगराध्यक्ष यु. टी. जाधव यांनी पारावर ज्येष्ठ नागरिकांची घेतली भेट; विकासकामांवर साधला संवाद | 'माणुसकीचा रेनकोट' : विश्वनायक फाउंडेशनकडून सिग्नलवरील गरजू बालक, महिला व वृद्धांना पावसाळी रेनकोटचे मोफत वाटप | सांगलीत 500+ पदांसाठी भव्य रोजगार मेळावा! 30 जुलैला 19 कंपन्यांची भरती | पत्रकार अक्षय यादव यांना ‘महाराष्ट्र जनगौरव पुरस्कार–२०२५’ने गौरविण्यात आले |