पुणे जिल्ह्यात ऊस दराची कोंडी फुटली, शेतकऱ्यांमध्ये समाधान

👤 राहुल टिबे ईश्वरपूर,सांगली | 📅 02 September 2026 | 👁 265 Views
पुणे जिल्ह्यात ऊस दराची कोंडी फुटली, शेतकऱ्यांमध्ये समाधान
पुणे जिल्ह्यातील शिरूर आणि दौंड तालुक्यात गेले 3 दिवस शेतकरी एल्गार सुरू होता. उसाला कमी दर मिळत होता म्हणून शेतकऱ्यांनी 5 सप्टेंबर पर्यंत ऊसतोड बंद ठेवण्याचा निर्णय घेतला होता.
काल नागरगाव (ता. शिरूर)येथे झालेल्या शेतकरी एल्गार सभेत कोंडी फुटली.गुऱ्हाळमालक एकनाथ शेलार यांनी पुढाकार घेतला यावर्षी गुऱ्हाळाला येणाऱ्या ऊसाला ₹4300 प्रति टन दर देणार असल्याची घोषणा केली उपस्थित शेतकऱ्यांनी या निर्णयाचे स्वागत केले आणि शेलार यांचा सत्कार केला दौंड तालुक्यात 700 गुऱ्हाळे आहेत. काही दिवसांपूर्वी FDA ने 17 लाखांचा भेसळयुक्त गूळ जप्त केल्यावर गुऱ्हाळ चालकांनी एकत्र येऊन ऊस दर थेट ₹4000 वरून ₹3500 वर आणला होता, त्यामुळे शेतकरी संतापले होते. आता शेतकरी ₹4500 ते ₹5000 दर मागत आहेत. मांडवगण आणि पारगाव येथे पण सभा झाली, तिथे ₹5000 ची मागणी एकमुखाने केली आहे. म्हणजे हा ₹4300 चा दर हा पहिला तोडगा आहे, शेतकरी एकजुटीचा विजय मानला जातोय.
Weather
Stock Market
Live Cricket
LIVE
मतदार यादी पुनरीक्षणाची प्रक्रिया निष्पक्ष, पारदर्शक व सर्वसमावेशक राबवावी- मतदार यादी निरीक्षक शीतल तेली-उगले | जतच्या पवनचक्क्यांमधील तारचोरीचा पर्दाफाश; एकाला अटक १४.७४ लाखांचा मुद्देमाल जप्त; सात चोरीचे गुन्हे उघडकीस | एसटी आरक्षणापासून नामकरणापर्यंत; विविध मागण्यांसाठी तासगावात धनगर समाज एकवटला : तासगाव तहसीलदारांना निवेदन; वीर शिंग्रोबा, अहिल्यादेवी होळकर यांच्या नावासह देवस्थानांच्या कारभारात पारदर्शकतेची मागणी | चोरीचे सोने विक्रीला आला अन् सांगली एलसीबी पोलिसांच्या जाळ्यात अडकला ४२ ग्रॅम सोन्याचे दागिने हस्तगत; ६ लाख ३० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त | शिक्षक दिनी आदर्श शिक्षक पुरस्कारासाठी श्री. घनश्याम सुभाष पाटील यांची निवड | चोरीचे सोने विकायला आला अन् सांगली एलसीबीच्या पोलिसांच्या हाती 'मुक्या "लागला; ‘मुक्या’कडून ६ लाखांचे दागिने जप्त | तासगावात उद्या सकाळी 10 वाजता रस्ता रोको सकल मराठा समाजाने पोलिसांना दिले निवेदन, | तासगाव-कवठेमहांकाळचे पालकत्व आमदार गोपीचंद पडळकरांकडे द्या; भाजप कार्यकर्त्यांची जोरदार मागणी | ईश्वरपूर शहरातील सिग्नल यंत्रणा धूळ खात! लाखो रुपयांचा चुराडा, विद्यार्थ्यांचा जीव धोक्यात | पुणे जिल्ह्यात ऊस दराची कोंडी फुटली, शेतकऱ्यांमध्ये समाधान |