घरफोडी-चोरी करणारा आरोपी जेरबंद; २९ ग्रॅम सोने, ३३९ ग्रॅम चांदीसह २.९५ लाखांचा मुद्देमाल जप्त सांगली शहर पोलिसांची कारवाई; चार घरफोडीचे गुन्हे उघडकीस

👤 संतोष एडके तासगाव | 📅 30 August 2026 | 👁 53 Views
घरफोडी-चोरी करणारा आरोपी जेरबंद; २९ ग्रॅम सोने, ३३९ ग्रॅम चांदीसह २.९५ लाखांचा मुद्देमाल जप्त सांगली शहर पोलिसांची कारवाई; चार घरफोडीचे गुन्हे उघडकीस
सांगली : सांगली शहर पोलीस ठाण्याच्या गुन्हे प्रकटीकरण शाखेने घरफोडी व चोरी करणाऱ्या एका आरोपीला जेरबंद करून त्याच्याकडून २९ ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने व ३३९ ग्रॅम वजनाचे चांदीचे दागिने असा एकूण २ लाख ९५ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला. या कारवाईमुळे सांगली शहर पोलीस ठाण्यात दाखल असलेले चार घरफोडी व चोरीचे गुन्हे उघडकीस आले आहेत.
पवन प्रकाश पवार (वय ३१, रा. भारत चौक, खणभाग, सांगली) असे अटक करण्यात आलेल्या संशयित आरोपीचे नाव आहे.
सांगली शहरातील घरफोडी व चोरीचे गुन्हे उघडकीस आणण्याचे आदेश पोलीस अधीक्षक तुषार दोषी व अपर पोलीस अधीक्षक कल्पना बारवकर यांनी दिले होते. उपविभागीय पोलीस अधिकारी अजय कोकाटे यांच्या मार्गदर्शनाखाली सांगली शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अरुण सुगांवकर यांनी गुन्हे प्रकटीकरण शाखेचे पथक तयार करून कारवाईचे आदेश दिले.
दरम्यान, २९ ऑगस्ट रोजी पोलीस हवालदार संदीप पाटील व सचिन तिवडे यांना त्यांच्या बातमीदारामार्फत पवन पवार हा चोरीचे दागिने विक्री करण्यासाठी सांगली शहरातील स्टेशन चौक येथे येणार असल्याची माहिती मिळाली. या माहितीच्या आधारे पोलिसांनी स्टेशन चौक येथे सापळा रचून पवन पवार याला ताब्यात घेतले. त्याची अंगझडती घेतली असता त्याच्याकडे सोने-चांदीचे दागिने आढळून आले.
पोलिसांनी त्याच्याकडे अधिक चौकशी केली असता, आकाशवाणी केंद्राच्या पाठीमागील बंद घराचे कुलूप तोडून तसेच हरिपूर रोड परिसरातील काळीवाट साई मंदिराजवळील घरातून दागिने चोरल्याची माहिती त्याने दिली. त्यानंतर सांगली शहर पोलीस ठाण्यातील गुन्हे अभिलेखाची पडताळणी केली असता आरोपीचा चार घरफोडी व चोरीच्या गुन्ह्यांशी संबंध असल्याचे निष्पन्न झाले.
या कारवाईत गुन्हा क्रमांक ३५/२०२६, ८०/२०२६, १९९/२०२६ आणि २३६/२०२६ अशा चार गुन्ह्यांचा तपास लागला आहे. आरोपीकडून २९ ग्रॅम सोन्याचे व ३३९ ग्रॅम चांदीचे दागिने असा एकूण २ लाख ९५ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
ही कारवाई पोलीस निरीक्षक अरुण सुगांवकर यांच्या आदेशानुसार पोउनि संतोष यादव, पोहेकॉ संदीप पाटील, सचिन तिवडे, विनायक शिंदे, सतीश लिंबळे, गौतम कांबळे, संतोष गळवे, शंकर रणधीर, डिसले, गणेश कांबळे, गणेश कोळेकर, अभिषेक वाडकर व दिग्विजय साळुंखे यांच्या पथकाने केली. आरोपीविरुद्ध पुढील तपास सुरू आहे.
Weather
Stock Market
Live Cricket
LIVE
मतदार यादी पुनरीक्षणाची प्रक्रिया निष्पक्ष, पारदर्शक व सर्वसमावेशक राबवावी- मतदार यादी निरीक्षक शीतल तेली-उगले | जतच्या पवनचक्क्यांमधील तारचोरीचा पर्दाफाश; एकाला अटक १४.७४ लाखांचा मुद्देमाल जप्त; सात चोरीचे गुन्हे उघडकीस | एसटी आरक्षणापासून नामकरणापर्यंत; विविध मागण्यांसाठी तासगावात धनगर समाज एकवटला : तासगाव तहसीलदारांना निवेदन; वीर शिंग्रोबा, अहिल्यादेवी होळकर यांच्या नावासह देवस्थानांच्या कारभारात पारदर्शकतेची मागणी | चोरीचे सोने विक्रीला आला अन् सांगली एलसीबी पोलिसांच्या जाळ्यात अडकला ४२ ग्रॅम सोन्याचे दागिने हस्तगत; ६ लाख ३० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त | शिक्षक दिनी आदर्श शिक्षक पुरस्कारासाठी श्री. घनश्याम सुभाष पाटील यांची निवड | चोरीचे सोने विकायला आला अन् सांगली एलसीबीच्या पोलिसांच्या हाती 'मुक्या "लागला; ‘मुक्या’कडून ६ लाखांचे दागिने जप्त | तासगावात उद्या सकाळी 10 वाजता रस्ता रोको सकल मराठा समाजाने पोलिसांना दिले निवेदन, | तासगाव-कवठेमहांकाळचे पालकत्व आमदार गोपीचंद पडळकरांकडे द्या; भाजप कार्यकर्त्यांची जोरदार मागणी | ईश्वरपूर शहरातील सिग्नल यंत्रणा धूळ खात! लाखो रुपयांचा चुराडा, विद्यार्थ्यांचा जीव धोक्यात | पुणे जिल्ह्यात ऊस दराची कोंडी फुटली, शेतकऱ्यांमध्ये समाधान |