झाराप रेल्वे स्टेशनवरुन हजारो टन अवैध खनिज सदृश्य मातीची वाहतूक

👤 तुषार शिंगाडे सिंधुदुर्ग | 📅 12 June 2026 | 👁 236 Views
झाराप रेल्वे स्टेशनवरुन  हजारो टन अवैध खनिज सदृश्य मातीची वाहतूक
झाराप रेल्वे स्टेशनवरुन अवैधरित्या हजारो टन खनिज सदृश्य मातीची रेल्वेने वास्को-गोवा येथे वाहतुक केली जात आहे.त्यासाठी सावंतवाडी तालुक्यातील तळवणे, कोंडुरा येथे अवैद्यरित्या उत्खनन केले जात आहे.याबाबत आज शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे माजी आमदार वैभव नाईक, माजी आमदार परशुराम उपरकर आणि प्रवक्ते जयेंद्र परुळेकर यांनी सिंधुदुर्ग जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांची भेट घेऊन अवैध उत्खनन आणि वाहतुकीवर कडक कायदेशीर कारवाई करावी अशी मागणी केली. त्याबाबतचे लेखी निवदेन जिल्हाधिकारी यांना देण्यात आले.
जनसुनावणी न घेता मायनिंग उद्योग कसा काय सुरु करण्यात आला.संबंधितांनी उत्खनन आणि वाहतुकीसाठी आवश्यक असणारे शासकीय परवाने घेतले आहेत का? असे प्रश्न यावेळी उपस्थित करत प्रति वर्षी २५ कोटी रुपयांचा शासनाचा महसूल बुडविण्यात आला आहे. या माध्यमातून सिंधुदुर्गात मोठा खनिज घोटाळा होत आहे. याबाबत विचारणा करण्यात आली. यावेळी जिल्हा खनिकर्म अधिकारी उमेश बर्डे देखील उपस्थित होते. जिल्हाधिकारी यांनी या अवैध उत्खनन आणि वाहतुकीच्या तक्रारीची गंभीर दखल घेत उत्खननासाठी आवश्यक असणारे शासकीय परवाने व इतर कायदेशीर बाबींची संपूर्ण माहिती देण्याचे आदेश उमेश बर्डे यांना दिले.
जिल्हाधिकारी यांना देण्यात आलेल्या निवेदनात म्हटले आहे कि, गेले दोन आठवडे कुडाळ तालुक्यातील झाराप रेल्वे स्टेशनवरुन फार मोठ्या प्रमाणावर खनिज सदृश्य मातीची वाहतुक वास्को-गोवा येथे होत आहे. गेल्या दोन आठवड्यात १० ते १२ रेल्वे ट्रेन दररोज भरुन ही खनिज सदृश्य माती नेली जात आहे. दिवसाला ५००-६०० डंपर भरुन आणण्यात येणाऱ्या खनिज सदृश्य माती वाहतुकीमुळे झाराप येथील ग्रामस्थांना प्रदुषणाचा व अपघाताच्या भयाचा मोठा त्रास सहन करावा लागत आहे. उपलब्ध माहितीनुसार सावंतवाडी तालुक्यातील तळवणे, कोंडुरा येथून अवैद्यरित्या उत्खनन करुन ही खनिज माती आणली जात आहे. एवढ्या मोठ्या प्रमाणावर जर ही खनिज माती तळवणे कोंडुरा भागातून आणण्यात येत आहे तर तिथे कुठल्याही शासकीय, प्रशासकीय परवानग्या न घेता तसेच कुठल्याही प्रकारचा पर्यावरण आघात अहवाल तसेच जनसुनावणी न घेता मायनिंग उद्योग सुरु झाला आहे काय? असा प्रश्न उपस्थित होत आहे. कुठल्याही शासकीय प्रशासकीय परवानग्या न घेता होत असलेला अवैद्य मायनिंग उद्योग शासनाचा महसुल बुडवून सुरु आहे काय? असाही गंभीर प्रश्न उपस्थित होत आहे. दोडामार्ग तालुक्यातील आडाळी M.I.D.C. क्षेत्रात रात्रीच्या अंधारात होत असलेल्या खनिज सदृश्य मातीच्या चोरीचा प्रकार उघड झालेला आहे. असे असताना झाराप रेल्वे स्टेशनवरुन नेण्यात आलेली हजारो टन खनिज सदृश्य माती ही कुठल्या नियमांतर्गत नेण्यात आली आहे. हे जनतेला कळले पाहिजे. अशाच प्रकारे जिल्ह्यात जागोजागी होत असलेल्या बेकायदेशीर अवैध मायनिंग विरोधात देखील कडक कारवाई करावी अशी मागणी निवेदनात करण्यात आली आहे.
Weather
Stock Market
Live Cricket
LIVE
उरुण- ईश्वरपुर मध्ये MPSC विद्यार्थ्यांचा भव्य मोर्चा | मतदार यादी पुनरीक्षणाची प्रक्रिया निष्पक्ष, पारदर्शक व सर्वसमावेशक राबवावी- मतदार यादी निरीक्षक शीतल तेली-उगले | जतच्या पवनचक्क्यांमधील तारचोरीचा पर्दाफाश; एकाला अटक १४.७४ लाखांचा मुद्देमाल जप्त; सात चोरीचे गुन्हे उघडकीस | एसटी आरक्षणापासून नामकरणापर्यंत; विविध मागण्यांसाठी तासगावात धनगर समाज एकवटला : तासगाव तहसीलदारांना निवेदन; वीर शिंग्रोबा, अहिल्यादेवी होळकर यांच्या नावासह देवस्थानांच्या कारभारात पारदर्शकतेची मागणी | चोरीचे सोने विक्रीला आला अन् सांगली एलसीबी पोलिसांच्या जाळ्यात अडकला ४२ ग्रॅम सोन्याचे दागिने हस्तगत; ६ लाख ३० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त | शिक्षक दिनी आदर्श शिक्षक पुरस्कारासाठी श्री. घनश्याम सुभाष पाटील यांची निवड | चोरीचे सोने विकायला आला अन् सांगली एलसीबीच्या पोलिसांच्या हाती 'मुक्या "लागला; ‘मुक्या’कडून ६ लाखांचे दागिने जप्त | तासगावात उद्या सकाळी 10 वाजता रस्ता रोको सकल मराठा समाजाने पोलिसांना दिले निवेदन, | तासगाव-कवठेमहांकाळचे पालकत्व आमदार गोपीचंद पडळकरांकडे द्या; भाजप कार्यकर्त्यांची जोरदार मागणी | ईश्वरपूर शहरातील सिग्नल यंत्रणा धूळ खात! लाखो रुपयांचा चुराडा, विद्यार्थ्यांचा जीव धोक्यात |