पत्रकार विलास बडे यांना TVJ awards 2026

👤 SANKET SANAP | 📅 14 May 2026 | 👁 300 Views
पत्रकार विलास बडे यांना  TVJ awards 2026
हा पुरस्कार बांधवांनी अर्थात कुटुंबाने दिलेली कौतुकाची थाप आहे. महाराष्ट्र TVJA Excellence Award 2026 मध्ये गडचिरोलीतील जंगलातल्या रिपोर्टिंगसाठी देशाचे माजी लष्करप्रमुख जनरल मनोज नरवणे सर, ज्येष्ठ पत्रकार मनोज भोयर सरांच्या हस्ते हा पुरस्कार देण्यात आला. यासाठी TVJA च्या पत्रकार बांधवांचे मनःपूर्वक आभार.पत्रकार विलास बडे

पुरस्कार मी स्विकारला असला, नाव माझं असलं तरी त्याच्यामागे अनेक हात आहेत. प्रेरणा आणि पाठबळ आहे. विश्वास आहे. ध्रुबज्योती प्सर, मंदार सर, सुनिल सर, अमित सर, महेश तिवारी, व्हिडिओ जर्नलिस्ट संदीप तसंच आमचे चालक महेश आणि अक्षय यांनी अतिशय कठीण परिस्थितीत न डगमगता साथ दिली. हा पुरस्कार त्यांचाही आहे. ज्यांनी शूट करून आणलेल्या स्टोरीवर कलाकुसर केली. ज्यांनी सलग २४ तास काम करून एडिट केली. त्याला साज चढवला दमदार व्हिडिओ एडिटर श्रीकांत परब आणि प्रसाद मेस्री यांनी. इनपुट, प्रोडक्शन टीम आणि ग्राफिक्स टीममधल्या पडद्यामागच्या प्रत्येक हाताचा हा सन्मान आहे.

यावेळी टीव्हीतल्या माझ्या इतर सहकाऱ्यांचा आणि नव्या दमाच्या पत्रकारांचाही गौरव करण्यात आला. यात प्राॅमिसिंग अनुजा धाक्रस, मनश्री पाठक, सुरभी, रिद्धी म्हात्रे, सुष्मिता, रूबिना, अभिषेक मुठाळ, अक्षय भाटकर, कृष्णा सोनवाडकर, विशाल पाटील, सिद्धेश कानसे, हर्षल हे उद्याचे पत्रकार आहेत. त्यांचंही खूप अभिनंदन.

या पुरस्कार सोहळ्याचं वैशिष्ट्य म्हणजे आॅपरेशन सिंदूरवेळी जीवाची बाजी लावून लढणाऱ्या जांबाज पत्रकारांचा सन्मान. जल, जमीन, जंगल कुठेही सैनिकासारखा लढणारा TVJA चा आमचा अध्यक्ष उदय पत्रकारांसाठी कायम लढत असतो. त्यांची टीम पत्रकारांना प्रोत्साहित करतीय. कौतुकाची थाप देतीय. त्यांच्यासाठी मदतीसाठी धावून जातीय त्यासाठी त्यांचे मनापासून आभार.

आणि सगळ्यात महत्वाचं तुम्ही मायबाप प्रेक्षक जे रोज पाठीवर थाप देत असतात
Weather
Stock Market
Live Cricket
LIVE
उरुण- ईश्वरपुर मध्ये MPSC विद्यार्थ्यांचा भव्य मोर्चा | मतदार यादी पुनरीक्षणाची प्रक्रिया निष्पक्ष, पारदर्शक व सर्वसमावेशक राबवावी- मतदार यादी निरीक्षक शीतल तेली-उगले | जतच्या पवनचक्क्यांमधील तारचोरीचा पर्दाफाश; एकाला अटक १४.७४ लाखांचा मुद्देमाल जप्त; सात चोरीचे गुन्हे उघडकीस | एसटी आरक्षणापासून नामकरणापर्यंत; विविध मागण्यांसाठी तासगावात धनगर समाज एकवटला : तासगाव तहसीलदारांना निवेदन; वीर शिंग्रोबा, अहिल्यादेवी होळकर यांच्या नावासह देवस्थानांच्या कारभारात पारदर्शकतेची मागणी | चोरीचे सोने विक्रीला आला अन् सांगली एलसीबी पोलिसांच्या जाळ्यात अडकला ४२ ग्रॅम सोन्याचे दागिने हस्तगत; ६ लाख ३० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त | शिक्षक दिनी आदर्श शिक्षक पुरस्कारासाठी श्री. घनश्याम सुभाष पाटील यांची निवड | चोरीचे सोने विकायला आला अन् सांगली एलसीबीच्या पोलिसांच्या हाती 'मुक्या "लागला; ‘मुक्या’कडून ६ लाखांचे दागिने जप्त | तासगावात उद्या सकाळी 10 वाजता रस्ता रोको सकल मराठा समाजाने पोलिसांना दिले निवेदन, | तासगाव-कवठेमहांकाळचे पालकत्व आमदार गोपीचंद पडळकरांकडे द्या; भाजप कार्यकर्त्यांची जोरदार मागणी | ईश्वरपूर शहरातील सिग्नल यंत्रणा धूळ खात! लाखो रुपयांचा चुराडा, विद्यार्थ्यांचा जीव धोक्यात |