राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रम (RBSK)चे काम राम भरोसे, या विरोधात मळेवाड कोंडुरे उपसरपंच हेमंत मराठे करणार उपोषण

👤 तुषार शिंगाडे सिंधुदुर्ग | 📅 25 July 2026 | 👁 129 Views
राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रम (RBSK)चे काम राम भरोसे, या विरोधात मळेवाड कोंडुरे उपसरपंच  हेमंत मराठे करणार उपोषण

सावंतवाडी - राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रम (RBSK) हा जन्मापासून ते १८ वर्षे वयोगटातील मुलांच्या आरोग्याची मोफत तपासणी व उपचार करणारा महत्त्वाचा शासकीय उपक्रम आहे. हा कार्यक्रम ४ प्रमुख घटकांवर (4 Ds - जन्माच्या वेळी दोष, रोग, कमतरता आणि विकास विलंब) काम करतो. राष्ट्रीय बाल स्वस्त अभियान अंतर्गत वर्षातून एकदा तपासणी केली जाते.मात्र मळेवाड कोंडुरे गावातील अंगणवाड्यांचा विचार केला असता काही अंगणवाडीतील मुलांची दीड वर्ष उलटूनही अद्याप पर्यंत तपासणी झालेली नाही असे दिसून येत आहे.तपासणी करण्यासाठी येणारे पथक हे वेळेत येत नसल्याने तपासणीपासून काही मुलं ही वंचित राहत आहेत.आज मळेवाड गावातील दोन अंगणवाड्यांमध्ये तपासणीसाठी तपासणी पथक येणार होते मात्र दुपारचे बारा वाजले तरीही पथक नआल्याने त्यांच्याशी संपर्क केला असता आमच्याकडे गाडी नसल्याने आम्हाला खाजगी गाडीने यावे लागते यामुळे उशीर होतो असे उत्तर पथकातील डॉक्टरानी दिले. पथकासाठी गाडी नाही यामुळे सर्वसामान्य मुलांची तपासणी होत नसेल तर आरोग्य यंत्रणा खरोखरच सलाईनवर असल्याचे स्पष्ट होत आहे.तसेच या पथकाने आतापर्यंत किती तपासण्या केल्या, किती मुलांना औषधोपचार केले किंवा दिव्यांग किंवा जन्मताच काही व्याधी आहे अशा किती मुलांचं तपासणी करून त्यावर कोणते उपचार करण्यात आले याबाबत जिल्हा शल्यचिकित्सक यांनी गांभीर्याने लक्ष देऊन यासर्वाची खातरजमा करून कार्यवाही करणे गरजेचे आहे.सर्वसामान्य मुलांच्या तपासणीसाठी बाल हक्क स्वास्थ कार्यक्रम अंतर्गत होणारी तपासणी ही रामभरोसे असून यात सुधारणा न झाल्यास या यंत्रणे विरोधात मळेवाड कोंडुरे उपसरपंच हेमंत मराठे हे सिंधूदुर्गनगरी ओरोस येथील जिल्हा शल्यचिकित्सक यांच्या कार्यालयासमोर गावातील मुले व त्यांचे पालक यांच्या समवेत उपोषण येणार असल्याचा इशारा मराठे यांनी दिला आहे
Weather
Stock Market
Live Cricket
LIVE
४ वर्षांपासून रखडलेले भटवाडी–दिर्बादेवी ११ के वी लाइन चे काम अखेर पूर्ण | राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रम (RBSK)चे काम राम भरोसे, या विरोधात मळेवाड कोंडुरे उपसरपंच हेमंत मराठे करणार उपोषण | रविवारी 'मुक्तसंवाद'मध्ये संगीत विशारद प्रसादजी शेवडे यांच्याशी सुरेल संवाद | उपरण्यावर अवतरला पंढरीचा विठुराया; देवगडच्या कलाकाराची भक्तीला रंगांची अनोखी अर्पणवेल | पूरग्रस्तांच्या मदतीसाठी भाजपाचा मदतीचा हात; जीवनावश्यक अन्नधान्य किटचे वाटप | आषाढी एकादशीचे अनोखे कलादर्शन; तांदळाच्या दाण्यावर अवतरले पांडुरंग;रिया कांबळीच्या अद्वितीय कलेला सलाम.. | तासगावच्या दीडशे वर्षांच्या सांस्कृतिक वारशाचा अमूल्य ठेवाही ठरतोय जीर्णोद्धाराची गरज! ​तासगावच्या गुरुवार पेठेतील श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिराचा समृद्ध इतिहास व धार्मिक परंपरा | मा. संजय काटकर (IAS) यांचा उपजिल्हा रुग्णालय, कवठेमहांकाळ येथे संवाद दौरा; ग्रामीण आरोग्य सेवांना गती देण्याचे निर्देश | जिल्हा सत्र,वरिष्ठ दिवाणी न्यायालयासाठी कवठे महांकाळ वकील संघटना आक्रमक.उपोषणाचा इशारा | सर्व दिंडी सोहळे पंढरपूर नगरीमध्ये दाखल" |