नवी दिल्ली :-PACL Ltd(पर्ल्स ) मधील गुंतवणूकदारांसाठी दिलासादायक बातमी आहे. जस्टिस (निवृत्त) आर. एम. लोढा समितीने बँक खात्याच्या त्रुटी दुरुस्त करण्यासाठीची मुदत वाढवली आहे. यापूर्वी 7 मे 2026 ते 6 ऑगस्ट 2026 पर्यंत गुंतवणूकदारांना बँक खात्यातील त्रुटी दुरुस्त करण्याची संधी देण्यात आली होती.आता ही सुविधा 6 ऑक्टोबर 2026 पर्यंत वाढवण्यात आली आहे. जास्तीत जास्त गुंतवणूकदारांना संधी मिळावी यासाठी मुदतवाढ देण्यात आली.ज्या गुंतवणूकदारांचे PACL रिफंड क्लेम बँक व्हेरिफिकेशन फेल झाल्यामुळे प्रलंबित आहेत, त्यांच्यासाठी ही संधी आहे.महत्वाचे म्हणजे ही सुविधा फक्त बँक खात्याशी संबंधित त्रुटींसाठी आहे. निवृत्त न्यायाधीश आर. एम. लोढा समिती PACL गुंतवणूकदारांना टप्प्याटप्प्याने रिफंड देत आहे.
तरी सर्व गुंतवणूकदार तसेच फिल्ड वर्कर्सनीं लवकरात लवकर आपले बँक खाते संदर्भात असणाऱ्या त्रुटी दुरुस्त करून घ्याव्या असे आवाहन जनलोक प्रतिष्ठान आणि सर्व सीनियर्स यांच्यावतीने करण्यात आले आहे.