कामेरी नाका खून प्रकरणातील दोघे आरोपी २४ तासांत जेरबंद; सांगली एलसीबी व ईश्वरपूर पोलिसांची संयुक्त कारवाई.

👤 संतोष एडके तासगाव | 📅 03 November 2026 | 👁 46 Views
कामेरी नाका खून प्रकरणातील दोघे आरोपी २४ तासांत जेरबंद; सांगली एलसीबी व ईश्वरपूर पोलिसांची संयुक्त कारवाई.



ईश्वरपूर : कामेरी नाका परिसरात झालेल्या तरुणाच्या निर्घृण खून प्रकरणाचा छडा लावण्यात सांगली स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा (एलसीबी) आणि ईश्वरपूर पोलिसांना यश आले आहे. खुनाच्या घटनेनंतर अवघ्या २४ तासांच्या आत पोलिसांनी दोन संशयित आरोपींना कासेगाव परिसरातून ताब्यात घेतले. साहिल अनिल कांबळे (वय २७) आणि अंकित मुकुंद कांबळे (वय ३०, दोघे रा. आंबेडकरनगर, ईश्वरपूर) अशी ताब्यात घेतलेल्या आरोपींची नावे आहेत.

या प्रकरणी सुरज महादेव कांबळे (वय ३१, रा. आंबेडकरनगर, ईश्वरपूर) यांचा खून झाल्याची फिर्याद ईश्वरपूर पोलीस ठाण्यात दाखल झाली होती. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दि. १ नोव्हेंबर रोजी रात्री साडेनऊच्या सुमारास कापड दुकानात झालेल्या भांडणाचा व पूर्वी लग्न मोडल्याच्या कारणावरून आरोपींच्या मनात राग होता. याच वादातून आरोपींनी संगनमत करून सुरज कांबळे यांच्यावर लोखंडी कोयता व चाकूसदृश धारदार हत्याराने डोके, कपाळ, चेहरा, पोट आणि पाठीवर वार केले. या हल्ल्यात गंभीर जखमी झाल्याने त्यांचा मृत्यू झाला.

घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलीस अधीक्षक तुषार दोशी आणि अप्पर पोलीस अधीक्षक कल्पना बारवकर यांनी आरोपींचा तातडीने शोध घेण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक संजीव झाडे यांनी सहायक पोलीस निरीक्षक राजेंद्र यादव यांच्या नेतृत्वाखाली पथक तयार केले. ईश्वरपूर पोलीस ठाण्याचे पथकही तपासात सहभागी झाले.

दोन्ही पथके गोपनीय माहितीच्या आधारे आरोपींचा शोध घेत असताना कासेगाव शहर परिसरात महामार्गालगत आरोपी असल्याची खात्रीशीर माहिती मिळाली. त्यानुसार पोलिसांनी कासेगाव ते कराड महामार्गावरील हॉटेल ९६ कुळीसमोरील रस्त्यावर सापळा रचून दोन्ही संशयितांना ताब्यात घेतले.

चौकशीदरम्यान त्यांनी जुन्या वादातून सुरज कांबळे यांच्यावर धारदार शस्त्रांनी हल्ला करून खूण केल्याची माहिती पोलिसांना दिली
सदर गुन्ह्यातील दोन्ही आरोपींना पुढील तपासासाठी ईश्वरपूर पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.ही कारवाई स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा, ईश्वरपूर पोलीस ठाणे आणि सायबर पोलीस ठाण्याच्या पथकांनी संयुक्तपणे केली.

या गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस निरीक्षक संदीप पाटील करीत आहेत.
Weather
Stock Market
Live Cricket
LIVE
फटाक्यांऐवजी आरोग्याचा प्रकाश! सौ. सु. गि. पाटील माध्यमिक विद्यालयात विद्यार्थ्यांचा 'प्रदूषणमुक्त दिवाळी'चा निर्धार* | सांगली जिल्हा बँकेत माजी खासदार संजय पाटील यांचा विजय :माजी आमदार सुमन पाटील यांचा पराभव! | कामेरी नाका खून प्रकरणातील दोघे आरोपी २४ तासांत जेरबंद; सांगली एलसीबी व ईश्वरपूर पोलिसांची संयुक्त कारवाई. | स्वामी विवेकानंद आदिवासी विद्यार्थी वस्तीगृह, देवलापार येथील सोळा वर्षीय विद्यार्थी बेपत्ता | परतूरमध्ये ५ नोव्हेंबरला भव्य संत संमेलन व हिंदू धर्म महामेळावा! | जळगाव जिल्हा बँक निवडणुकीत मोठा राजकीय भूकंप | *जिल्हा परिषद एसीबीचा मोठी कारवाई ! १० हजारांची लाच घेताना उपविभागीय अधिकारी आणि कनिष्ठ अभियंता जाळ्यात* | रान पिकवलं, रेकॉर्ड मोडला! भडगावच्या संजय पाटलांचा ज्वारी उत्पादनात संपूर्ण महाराष्ट्रात डंका; हेक्टरी १०२.२५ क्विंटलचा नवा उच्चांक* | उमरेड - करह्रांडला अभ्यारण्यातील गोठणगाव चा युवा नर वाघ पोहोचला पेंचच्या चोर बाहुली जंगलात | सांगली जिल्हा बँकेच्या रणांगणात राजकीय भूकंपाची चाहूल! |