स्वामी विवेकानंद आदिवासी विद्यार्थी वस्तीगृह, देवलापार येथील सोळा वर्षीय विद्यार्थी बेपत्ता
👤 नितिन बोरसरे, रामटेक |
📅
03 November 2026 |
👁 7 Views
दहावीची परीक्षा देण्यासाठी गेलेल्या 16 वर्षीय विद्यार्थी संग्राम परीक्षा संपल्यानंतर विद्यालया बाहेर पडला. मात्र तो राहत असलेल्या स्वामी विवेकानंद आदिवासी विद्यार्थी वस्तीगृहात परतलाच नसल्याने तो बेपत्ता का व कसा झाला यासोबतच वस्तीगृहाच्या प्रशासनाच्या सुरक्षितेवर गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. मागील 29 ऑक्टोंबर पासून बेपत्ता विद्यार्थी अद्यापही परत न आल्याचे दोन नोव्हेंबरला समोर आले आहे. त्यामुळे वस्तीगृहाच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. संग्राम भीमप्रसाद पटले वय सोळा वर्षे राहणार तिरोडी ग्राम मिर्जापुर तालुका पांढरवाडी जिल्हा बालाघाट मध्य प्रदेश असे बेपत्ता विद्यार्थ्याचे नाव आहे. देवलापार पोलिसात याची तक्रार करण्यात आली आहे.शासन आदिवासी वस्तीगृहांवर करोडो रुपये खर्च करते मात्र व्यवस्थापन त्यांच्या निवासाच्या सोयी, सुविधा, सुरक्षा व देखरेखीबाबत फारसे गंभीर राहत नसल्याचे कित्येकदा लक्षात आले आहे वस्तीगृहाच्या या निष्काळजीपणावर शासन, प्रशासन कोणती कारवाई करते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.