‘गो सन्मान आव्हान अभियान २०२६’ अंतर्गत आयोजन; हजारो भाविकांच्या उपस्थितीची अपेक्षा
जालना प्रतिनिधी | हनुमंत दवंडे
परतूर (प्रल्हादपूर) शहरात सकल हिंदू समाजाच्या वतीने ‘गो सन्मान आव्हान अभियान २०२६’ अंतर्गत भव्य-दिव्य संत संमेलन व हिंदू धर्म महामेळाव्याचे आयोजन गुरुवार, दिनांक ५ नोव्हेंबर २०२६ रोजी करण्यात आले आहे. सायंकाळी ५ वाजता या धार्मिक सोहळ्याला सुरुवात होणार आहे.
या धर्मकार्याला विविध संत-महंतांचे आशीर्वाद व मार्गदर्शन लाभणार असून, अनेक पूजनीय संत-महाराजांची उपस्थिती राहणार आहे. या सोहळ्याच्या माध्यमातून गोमातेचा सन्मान, हिंदू धर्माचे संवर्धन, धार्मिक जागृती आणि सामाजिक एकतेचा संदेश देण्यात येणार आहे.
या भव्य धार्मिक कार्यक्रमाला परतूर शहरासह तालुक्यातील हजारो भाविक भक्तांनी, हिंदू बांधवांनी व भगिनींनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवावी, असे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.
कार्यक्रमाचे स्थळ : सराफा मार्केट, भाजी मंडई, जुना मोंढा, परतूर, ता. परतूर, जि. जालना.
आयोजक : सकल हिंदू समाज, परतूर (प्रल्हादपूर) शहर व तालुका.
गोमातेचा सन्मान, धर्माचे रक्षण आणि समाजाची एकता — या संकल्पनेतून आयोजित या भव्य धार्मिक सोहळ्यात सर्वांनी सहभागी व्हावे, असे आवाहन करण्यात आले आहे.