शिवसेनेच्या दोन तर भाजपच्या एका उमेदवाराची संचालकपदी निवड; पारोळा, एरंडोल आणि भुसावळमध्ये बिनविरोध विजय

👤 शुभम सुराणा जळगाव | 📅 31 October 2026 | 👁 265 Views
शिवसेनेच्या दोन तर भाजपच्या एका उमेदवाराची संचालकपदी निवड; पारोळा, एरंडोल आणि भुसावळमध्ये बिनविरोध विजय
*शिवसेनेच्या दोन तर भाजपच्या एका उमेदवाराची संचालकपदी निवड; पारोळा, एरंडोल आणि भुसावळमध्ये बिनविरोध विजय*

जळगाव (प्रतिनिधी) : जळगाव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीत महायुतीने दमदार सुरुवात केली आहे. उमेदवारी अर्ज माघारीची मुदत संपल्यानंतर पारोळा, एरंडोल आणि भुसावळ या तीन सोसायटी मतदारसंघांतील जागा बिनविरोध झाल्याचे स्पष्ट झाले आहे. यामध्ये शिवसेनेच्या दोन आणि भाजपच्या एका उमेदवाराचा समावेश आहे. या निवडीमुळे जिल्हा बँकेच्या संचालक मंडळात तीन नवीन महिला चेहऱ्यांना संधी मिळाली आहे.कायदे पहा
जिल्हा बँक निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर छाननी आणि माघारीची प्रक्रिया पार पडली. निर्धारित मुदतीत इतर उमेदवारांनी माघार घेतल्याने महायुतीच्या तीन उमेदवारांची बिनविरोध निवड निश्चित झाली.
पारोळा सोसायटी मतदारसंघातून नलिनी चिमणराव पाटील, तर एरंडोल सोसायटी मतदारसंघातून मृणाल अमोल पाटील यांची बिनविरोध निवड झाली आहे. नलिनी पाटील या माजी आमदार चिमणराव पाटील यांच्या पत्नी, तर मृणाल पाटील या आमदार अमोल पाटील यांच्या पत्नी आहेत. त्यामुळे या दोन्ही राजकीय कुटुंबांचे जिल्हा बँकेतील प्रतिनिधित्व कायम राहणार आहे.मंत्री संजय सावकारे यांच्या पत्नीही बिनविरोध
भुसावळ सोसायटी मतदारसंघातून राज्यमंत्री तथा भाजप नेते संजय सावकारे यांच्या पत्नी रजनीताई संजय सावकारे यांचीही बिनविरोध निवड झाली आहे. त्यांच्या निवडीमुळे भुसावळ मतदारसंघातून भाजपला संचालकपद मिळाले आहे.
या तीन जागा बिनविरोध झाल्याने जिल्हा बँकेच्या निवडणुकीत महायुतीने आपले खाते उघडले आहे. या निकालामुळे महायुतीच्या गोटात आनंदाचे वातावरण आहे. आता उर्वरित जागांवर कोणते उमेदवार निवडणूक रिंगणात राहतात आणि पुढील लढतीचे चित्र कसे असेल, याकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.
Weather
Stock Market
Live Cricket
LIVE
सांगली जिल्हा बँकेच्या रणांगणात राजकीय भूकंपाची चाहूल! | भडगाव येथे AEG फाउंडेशनच्या वतीने कृषी उद्योजकांना प्रमाणपत्रांचे वितरण . | युवरंग २०२६ वर मुळजी जेठा महाविद्यालयाची मोहोर; चोपडा महाविद्यालय उपविजेतेपदी! | एका क्षणात होत्याचे नव्हते! भरधाव कारचा भीषण अपघात; तेलंगणातील चालकाचा दुर्दैवी अंत, तिघे रुग्णालयात मृत्यूशी झुंज देत आहे | रक्तदानाच्या माध्यमातून गरजू रुग्णांना जीवनदान देणाऱ्या कुचीच्या वैभव सरवदे यांना राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित! | कुचीमध्ये विहिरीत आढळला अज्ञात व्यक्तीचा मृतदेह; गावात खळबळ! | न्यायालयाचे ‘कायदेशीर कवच’ विद्यार्थ्यांच्या दारात: भडगावमध्ये ‘सुरक्षित बचपन’ अभियानाचा दिमाखदार समारोप! | 39 वर्षांच्या प्रदीर्घ सेवेनंतर मुंबई पोलीस दलातील PSI संजय टिबे सेवानिवृत्त | शिवसेनेच्या दोन तर भाजपच्या एका उमेदवाराची संचालकपदी निवड; पारोळा, एरंडोल आणि भुसावळमध्ये बिनविरोध विजय | सागवान लाकूड चोरी रोखण्यासाठी गेलेल्या वनमजुरावर कुऱ्हाडीने हल्ला; दोन्ही हातांवर केले वार! |