रामटेक : सागवान लाकूड चोरी रोखण्यासाठी गेलेल्या वनमजुरावर कुऱ्हाडीने हल्ला; दोन्ही हातांवर केले वार!सत्रापूर शिवारातील घटना; गंभीर जखमी वनमजूर नागपूर मेडिकलमध्ये दाखल

👤 नितिन बोरसरे, रामटेक | 📅 30 October 2026 | 👁 9 Views
 रामटेक : सागवान लाकूड चोरी रोखण्यासाठी गेलेल्या वनमजुरावर कुऱ्हाडीने हल्ला; दोन्ही हातांवर केले वार!सत्रापूर शिवारातील घटना; गंभीर जखमी वनमजूर नागपूर मेडिकलमध्ये दाखल
या हल्ल्यात एकनाथ भोयर (रा. बांदी, ता. रामटेक) हे वनमजूर गंभीर जखमी झाले आहेत. तर प्रकाश जयपत परतेती (रा. बोरडा, ता. रामटेक) असे आरोपीचे नाव असल्याचे वृत्त आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, जंगलातील सागवान लाकडाची तोड करून चोरी केली जात असल्याचे निदर्शनास आल्यानंतर वनमजूर एकनाथ भोयर यांनी आरोपीला जाब विचारला. तसेच मोबाईलमध्ये फोटो काढण्याचा प्रयत्न केला. याचा राग आल्याने आरोपीने त्यांच्यावर कुऱ्हाडीने दोन्ही हातांवर वार केले आणि घटनास्थळावरून पळ काढला.
घटनेची माहिती मिळताच वन विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. जखमी वनमजुराला प्राथमिक उपचारानंतर नागपूर येथील मेडिकल रुग्णालयात दाखल करण्यात आले.
दरम्यान, पोलिसांनी आरोपीचा शोध घेऊन त्याला ताब्यात घेतले असून हल्ल्यात वापरलेली कुऱ्हाडही जप्त केली आहे. पुढील तपास पोलीस करीत आहेत.
Weather
Stock Market
Live Cricket
LIVE
रामटेक : सागवान लाकूड चोरी रोखण्यासाठी गेलेल्या वनमजुरावर कुऱ्हाडीने हल्ला; दोन्ही हातांवर केले वार!सत्रापूर शिवारातील घटना; गंभीर जखमी वनमजूर नागपूर मेडिकलमध्ये दाखल | *‘दरिया’ नव्हे ‘समंदर’ शोधा; दुष्काळाचे भान आणि समतेच्या जागरानं कवयित्री बहिणाबाई चौधरी विद्यापीठात ‘युवारंग २०२६’ चा रणगजर!* *कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठात ‘युवारंग २०२६’ व ‘दिव्यांग कला महोत्सवा’चे डॉ. भरत अमळकर यांच्या हस्ते उद | *न्यायालयाच्या उंबरठ्यावर असंतोषाची ठिणगी: भडगाव दिवाणी व फौजदारी न्यायालयाचे कामकाज ५ नोव्हेंबरला ठप्प होण्याची शक्यता; कर्मचारी सामूहिक रजेवर जाण्याच्या तयारीत!* | नागपूर पदवीधर मतदारसंघातून अभिजित वंजारी विजयी; सुधाकर कोहळे यांचा पराभव! | *'सुरक्षित बालपण' व्याख्यानमालेने जागविली बालकांची सजगता: सौ. सुमनताई गिरधर पाटील माध्यमिक विद्यालय व सौ. जयश्री गणेश पूर्णपात्री कनिष्ठ महाविद्यालयात तीन दिवसीय शिबिराची दिमाखात सांगता!* | कवठे एकंद–नागाव परिसरात केबल-मोटार चोरांचा धुमाकूळ; तासगाव पोलिसांचा तपास कुठे अडकला | बँक ऑफ महाराष्ट्रची ३ कोटींची फसवणूक; ९ वर्षे १० महिन्यांपासून फरार आरोपी जेरबंद सांगली आर्थिक गुन्हे अन्वेषण शाखेची कारवाई; इस्लामपूर येथील बनावट सातबारा प्रकरण | अंतर्नाद प्रतिष्ठानचा सेवेचा दीप उजळतोय अकराव्या वर्षात ! ‘वाटीभर फराळ’ उपक्रमातून वंचितांची दिवाळी गोड करणार | भडगाव तहसीलदार कारवाईसाठी जात असताना अपघातात जखमी | रामटेक गडमंदिरात पारंपरिक काकड आरती महोत्सवाला उद्यापासून प्रारंभ |