*भडगाव तालुक्यातील ग्रामसभांचा खोळंबा; चौकशी करून ८ दिवसांत सभा घेण्याची 'मराठा महासंघा'ची मागणी*

👤 शुभम सुराणा जळगाव | 📅 23 October 2026 | 👁 23 Views
*भडगाव तालुक्यातील ग्रामसभांचा खोळंबा; चौकशी करून ८ दिवसांत सभा घेण्याची 'मराठा महासंघा'ची मागणी*
*भडगाव तालुक्यातील ग्रामसभांचा खोळंबा; चौकशी करून ८ दिवसांत सभा घेण्याची 'मराठा महासंघा'ची मागणी*

*भडगाव (प्रतिनिधी):*

भडगाव तालुक्यातील ज्या ग्रामपंचायतींमध्ये २ ऑक्टोबर २०२६ रोजी कायद्यानुसार बंधनकारक असलेल्या ग्रामसभा घेण्यात आलेल्या नाहीत, त्यांची सखोल चौकशी करण्यात यावी. तसेच उर्वरित सर्व गावांमध्ये येत्या आठ दिवसांच्या आत ग्रामसभांचे आयोजन करण्यात यावे, अशी आक्रमक मागणी अखिल भारतीय मराठा महासंघाच्या जळगाव पश्चिम जिल्हा शाखेने केली आहे. यासंदर्भात महासंघाच्या वतीने भडगावचे गटविकास अधिकारी (BDO) यांना अधिकृत निवेदन सादर करण्यात आले आहे.
शासकीय नियमांनुसार आणि ७३ व्या घटनादुरुस्तीनुसार २ ऑक्टोबर रोजी प्रत्येक ग्रामपंचायतीत ग्रामसभा घेणे बंधनकारक आहे. मात्र, भडगाव तालुक्यातील अनेक गावांमध्ये या कायदेशीर नियमाची पायमल्ली झाल्याचे दिसून येत आहे. अनेक ठिकाणी ग्रामसभा झाल्याच नसल्याचे समोर आले आहे.
*निवेदनातील मुख्य मागण्या आणि इशारा:*
१).भडगाव तालुक्यातील एकूण किती आणि कोणत्या गावांमध्ये २ ऑक्टोबरला ग्रामसभा झाल्या, याची सविस्तर माहिती तात्काळ जाहीर करावी.
२).ज्या ग्रामपंचायतींमध्ये अद्याप ग्रामसभा झालेल्या नाहीत, तिथे येत्या ८ दिवसांत प्रशासनाने नियोजन करून सभा घडवून आणाव्यात.
३). २ऑक्टोबरला ग्रामसभा न होण्यामागे नेमके काय कारण आहे आणि यासाठी कोण जबाबदार आहे, याची सखोल चौकशी व्हावी.
४).प्रशासनाने यावर तात्काळ कारवाई न केल्यास, अखिल भारतीय मराठा महासंघाच्या वतीने तीव्र जनआंदोलन उभारण्यात येईल, असा इशारा निवेदनात देण्यात आला आहे.
हे निवेदन अखिल *भारतीय मराठा महासंघाचे जिल्हाध्यक्ष श्री. प्रदीप भिकनराव पाटील* यांच्या नेतृत्वाखाली देण्यात आले. याप्रसंगी जिल्हा सरचिटणीस जगदीश प्रदीप शिंदे, जिल्हा सहसरचिटणीस देविदास दौलत पाटील, जिल्हा संघटक रुपेश निकम पाटील, युवराज पाटील, भूषण पाटील, प्रकाश पाटील यांच्यासह महासंघाचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. या निवेदनाच्या प्रती. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस, ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे, जळगावचे जिल्हाधिकारी आणि मुख्य कार्यकारी अधिकारी (CEO), प्रांताधिकारी पाचोरा, तहसीलदार भडगाव यांनाही माहितीसाठी पाठवण्यात आले आहेत.
Weather
Stock Market
Live Cricket
LIVE
*भडगाव तालुक्यातील ग्रामसभांचा खोळंबा; चौकशी करून ८ दिवसांत सभा घेण्याची 'मराठा महासंघा'ची मागणी* | नशेसाठी पैसे न दिल्याने ४५ वर्षीय व्यक्तीवर धारदार शस्त्राने हल्ला | चांदवडमध्ये भरदिवसा सुरेश खैरे यांची हत्या; घटनेने शहरात खळबळ, मृतदेह शासकीय रुग्णालयात | जळगावात लोकसंघर्ष मोर्चाच्या पदाधिकाऱ्यांसह आंदोलकांवर गुन्हे दाखल | जळगावात खून, दुचाकीचा किरकोळ वादातून तरुणाची हत्या, एक जखमी | मानापूर येथे श्रीराम सेनेतर्फे रावण वध; सूर्पणखेचाही वध | गुंडेवाडीतील खूनप्रकरणी सांगली एलसीबीची धडाकेबाज कामगिरी; मुख्य संशयितासह विधीसंघर्षग्रस्त बालक ताब्यात | ईश्वरपुरात रेकॉर्डवरील आरोपी पिस्तुलासह जेरबंद : सांगली एलसीबीची कारवाई. ८१ हजारांचा मुद्देमाल जप्त; विनापरवाना शस्त्र बाळगल्याप्रकरणी गुन्हा दाखल. | पदवीधर-शिक्षक निवडणुकीत मुद्रित जाहिरातींसाठी MCMC प्रमाणपत्र बंधनकारक - डॉ. मैनाक घोष | *जळगावच्या बांभोरी उड्डाणपुलावर मोठा अपघात तीन चुलतभावांचा मृत्यू….* |