रामटेकमध्ये श्री दुर्गा माता दौड उत्साहात संपन्न; सकल हिंदू समाजाचा पुढाकार

👤 नितिन बोरसरे, रामटेक, | 📅 18 October 2026 | 👁 25 Views
रामटेकमध्ये श्री दुर्गा माता दौड उत्साहात संपन्न; सकल हिंदू समाजाचा पुढाकार

रामटेक : नवरात्रोत्सवानिमित्त रविवार, १८ ऑक्टोबर रोजी रामटेक येथे सकल हिंदू समाजाच्या वतीने श्री दुर्गा माता दौडीचे आयोजन करण्यात आले. सकाळी ठीक ६ वाजता छत्रपती शिवाजी महाराज स्मारक येथून दौडीला प्रारंभ झाला.

या दौडीचा मार्ग आंबेडकर चौक, गांधी चौक मार्गे कुमारिका देवी मंदिर असा होता. कुमारिका देवी मंदिर येथे आरती करून दौडीची सांगता करण्यात आली.

नवरात्रीच्या नऊ दिवसांमधून एक तास दुर्गा माता दौडीसाठी देण्याचे आवाहन आयोजकांनी केले होते. धार्मिक श्रद्धा, संस्कृती आणि सामाजिक एकतेचा संदेश देणाऱ्या या उपक्रमात नागरिकांनी सहभाग घेतला.

या आयोजनात सागर गेरवाल, ईशान कठाणे, तुषार सावरकर, सागर चरडे, अजय चांदेकर, वैभव उराडे, कुणाल महाजन, शिवम जेजल, राजू महाजन, हर्षल धामट, हरेश ठाकरे यांच्यासह इतरांनी सहभाग घेतला.

Weather
Stock Market
Live Cricket
LIVE
रामटेकमध्ये श्री दुर्गा माता दौड उत्साहात संपन्न; सकल हिंदू समाजाचा पुढाकार | आमडी गावातील युवकांचा शिवसेनेत प्रवेश; राज्यमंत्री आशिष जयस्वाल यांच्या उपस्थितीत पक्षप्रवेश | शासकीय योजनांचा लाभ मिळवण्यासाठी शेतकऱ्यांनी आवश्यक नोंदणी पूर्ण करावी तहसीलदार विशाल नाईकवाडे यांचे निफाड तालुक्यातील शेतकऱ्यांना आवाहन | न्यायालयाच्या दारातच न्यायासाठी लढा: भडगाव दिवाणी व फौजदारी न्यायालयातील कर्मचाऱ्यांचे ‘काळी फीत’ लावून मूक आंदोलन | वागदर्दी धरणात दुर्दैवी घटना; बैल धुण्यासाठी गेलेल्या डोणगावच्या राहुल सोमसे यांचा मृत्यू | आईने २० रुपये दिले नाहीत; रामटेक तालुक्यातील १३ वर्षीय विद्यार्थ्याचा शेतात गळफास घेतलेल्या अवस्थेत मृत्यू | शाळेतून घरी परतण्याचा प्रवास एका विद्यार्थ्यासाठी अखेरचा ठरला | चांदवड तालुक्यात १४ वर्षीय दहावीच्या विद्यार्थिनीची प्रसूती; नवजात बालिकेसह जिल्हा रुग्णालयात हलविले* | कोळगावात महात्मा फुले स्मारकासाठी जागा द्या ग्रामस्थांचा इशारा | तहसीलदार अतुल पाटोळे यांची विभागीय चौकशी करा |