तहसीलदार अतुल पाटोळे यांची विभागीय चौकशी करा

👤 संतोष एडके तासगाव | 📅 11 October 2026 | 👁 176 Views
तहसीलदार अतुल पाटोळे यांची विभागीय चौकशी करा




तासगाव (ता.तासगाव) तहसीलदार अतुल पाटोळे यांच्या कार्यकाळातील महसुली प्रकरणे व निर्णयप्रक्रियेची सखोल चौकशी करावी.महसुली केसेसमध्ये मॅनेज निकाल दिल्याने अतुल पाटोळे यांची विभागीय चौकशी प्रस्तावित करुन तात्काळ निलंबन करावे.अशी मागणी राष्ट्रीय दलित पँथर सेनेचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष प्रशांत केदार यांनी पुणे विभागीय आयुक्त यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.
तासगाव तहसील कार्यालयात चालणाऱ्या महसुली प्रकरणांमधील निर्णयप्रक्रिया,प्रकरणांची सुनावणी, संबंधित कागदपत्रांची पडताळणी तसेच वरिष्ठ महसुली अधिकाऱ्यांच्या आदेशांचे पालन न करता उल्लंघन करण्यात आले आहे.प्रकरणाच्या निर्णयप्रक्रियेत मोठी अनियमितता आढळून येत आहे.तहसीलदार यांनी अनेक महसुली प्रकरणांमध्ये नियमबाह्य आदेश पारित केलेत.प्रांताधिकारी यांचे आदेशाने फेर चौकशी सुनावणीमध्ये आर्थिक तडजोडी करून महसुली कायद्याचे उल्लंघन केले आहे.काही प्रकरणात प्रांताधिकारी यांच्या निर्णयालाच केराची टोपली दाखविण्यात आली आहे. तेंव्हा तहसीलदारकडील महसुली न्याय प्रकरणांमध्ये पारित आदेश,प्रकरणनिहाय अभिलेख आधारित तपासणी करावी..
महसुली प्रकरणांच्या निकाल प्रक्रियेत नियमबाह्य हस्तक्षेप,प्रक्रियात्मक त्रुटी आहेत.तसेच पदाचा गैरवापर करण्यात आला आहे.तेंव्हा महसुली केसेसमध्ये मॅनेज निकालाची जबाबदारी तहसीलदार यांच्यावर पूर्णतः निश्चित करण्यात यावी.संबंधित प्रकरणांची स्वतंत्रपणे चौकशी करून वस्तुस्थिती स्पष्ट करावी.तहसीलदार पाटोळे यांनी संविधानिक पदाचा गैरवापर केला आहे.तेंव्हा त्यांच्यावरील आरोपांचे गांभीर्य तसेच उपलब्ध अभिलेख आणि लागू सेवा नियम विचारात घेऊन चौकशी दरम्यान निलंबन करणे गरजेचे आहे.याबाबत तात्काळ सक्षम अधिकारी प्राधिकाऱ्याने निर्णय घेत निलंबन कारवाई आदेश पारित करावेत.
तहसीलदार पाटोळे यांच्या मनमानी व भ्रष्ट कारभारामुळे तहसीलदार महसुली न्यायप्रक्रियेवरील नागरिकांच्या विश्वास तडा गेला आहे.प्रकरणांचा निष्पक्ष निपटारा व्हावा आणि महसुल प्रशासनात पारदर्शकता निर्माण व्हावी यासाठी विभागीय आयुक्तांनी तक्रारीची गांभीर्याने दखल घेऊन चौकशी आदेश पारित करावेत. अशी मागणी प्रदेशाध्यक्ष प्रशांत केदार यांनी निवेदनात केली आहे.निवेदनावर ऋषिकेश गुजले,यश शिरतोडे,संजय देवकुळे,सागर कोळी,अजित कांबळे,आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत.

Weather
Stock Market
Live Cricket
LIVE
तहसीलदार अतुल पाटोळे यांची विभागीय चौकशी करा | *लग्नाला अवघे ५ महिने, नवविवाहित दाम्पत्याची तापी नदीत उडी घेऊन आत्महत्या!* | शिरोशीतील कातकरीपाडा व काकडमाळ येथील विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप | वाडा प्रभाग क्रमांक ११ मध्ये ‘आपली नगरसेविका आपल्या दारी’ अभियान नगरसेविका सौ. सविता वनगा नागरिकांच्या समस्या जाणून घेणार | सारसून येथे आठवडी बाजार समितीचा भव्य आठवडी बाजार | भडगावात लहान मुलाच्या अपहरणाचा डाव फसला; टू व्हीलर वर आले होते दोन संशयित पालकांना सतर्कतेचे आवाहन | ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांचे निधन; वयाच्या ७५व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास | सिद्धी सूर्यवंशीची राज्य अजिंक्यपद कबड्डी निवड चाचणीसाठी निवड | तासगाव तालुक्यात ‘सेवा सेतू’चे भव्य शिबिर; निमणी येथे गुरुवारी आयोजन : तहसीलदार अतुल पाटोळे. | तासगाव तालुक्यात ‘सेवा सेतू’चे भव्य शिबिर; निमणी येथे गुरुवारी आयोजन : तहसीलदार अतुल पाटोळे. |