शिरोशीतील कातकरीपाडा व काकडमाळ येथील विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप

👤 जितेंद्र मोरघा | 📅 11 October 2026 | 👁 13 Views
शिरोशीतील कातकरीपाडा व काकडमाळ येथील विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप
तालुक्यातील ग्रामपंचायत शिरोशी हद्दीतील कातकरीपाडा व काकडमाळ येथील शाळेत जाणाऱ्या विद्यार्थ्यांसह अंगणवाडीतील बालकांना धरतरी ग्रुप व कैलास खुरकुटे यांच्या वतीने वह्या, पेन तसेच इतर शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले.
ग्रामीण व आदिवासी भागातील विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी प्रोत्साहन मिळावे, त्यांना आवश्यक शैक्षणिक साहित्य उपलब्ध व्हावे आणि शिक्षणाची गोडी निर्माण व्हावी, या उद्देशाने हा उपक्रम राबविण्यात आला. शालेय साहित्य मिळाल्याने विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर आनंद दिसून आला. अशा उपक्रमांमुळे विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी प्रोत्साहन मिळण्यासोबतच सामाजिक बांधिलकी जपण्याचा संदेशही समाजात पोहोचतो.
या उपक्रमावेळी धरतरी ग्रुपचे सचिव संदीप पाटारा, सदस्य भारत पाटारा, शिरोशी ग्रामपंचायतीचे रोजगार सहाय्यक रमण खरपडे, ग्रामस्थ वनसू भोये, बाळा भोये, हेमंत भोये,दीपक सुरेश पवार तसेच शाळेतील विद्यार्थी व इतर ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
आदिवासी व ग्रामीण भागातील मुलांच्या शिक्षणाला हातभार लावणारा हा उपक्रम कौतुकास्पद असून, अशा सामाजिक उपक्रमांतून विद्यार्थ्यांचे शैक्षणिक भविष्य अधिक सक्षम करण्यासाठी समाजातील विविध घटकांनी पुढाकार घेण्याची गरज आहे.
Weather
Stock Market
Live Cricket
LIVE
*लग्नाला अवघे ५ महिने, नवविवाहित दाम्पत्याची तापी नदीत उडी घेऊन आत्महत्या!* | शिरोशीतील कातकरीपाडा व काकडमाळ येथील विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप | वाडा प्रभाग क्रमांक ११ मध्ये ‘आपली नगरसेविका आपल्या दारी’ अभियान नगरसेविका सौ. सविता वनगा नागरिकांच्या समस्या जाणून घेणार | सारसून येथे आठवडी बाजार समितीचा भव्य आठवडी बाजार | भडगावात लहान मुलाच्या अपहरणाचा डाव फसला; टू व्हीलर वर आले होते दोन संशयित पालकांना सतर्कतेचे आवाहन | ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांचे निधन; वयाच्या ७५व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास | सिद्धी सूर्यवंशीची राज्य अजिंक्यपद कबड्डी निवड चाचणीसाठी निवड | तासगाव तालुक्यात ‘सेवा सेतू’चे भव्य शिबिर; निमणी येथे गुरुवारी आयोजन : तहसीलदार अतुल पाटोळे. | तासगाव तालुक्यात ‘सेवा सेतू’चे भव्य शिबिर; निमणी येथे गुरुवारी आयोजन : तहसीलदार अतुल पाटोळे. | सांगली एलसीबीची विशेष मोहीम; पारधी समाजातील १४ पाहिजे, फरारी आरोपी पोलिसांसमोर हजर. |