वाडा प्रभाग क्रमांक ११ मध्ये ‘आपली नगरसेविका आपल्या दारी’ अभियान नगरसेविका सौ. सविता वनगा नागरिकांच्या समस्या जाणून घेणार

👤 जितेंद्र मोरघा | 📅 11 October 2026 | 👁 12 Views
वाडा प्रभाग क्रमांक ११ मध्ये ‘आपली नगरसेविका आपल्या दारी’ अभियान  नगरसेविका सौ. सविता वनगा नागरिकांच्या समस्या जाणून घेणार
वाडा नगरपंचायतीच्या प्रभाग क्रमांक ११ मधील नागरिकांच्या समस्या, अडचणी आणि सूचना थेट जाणून घेण्यासाठी नगरसेविका सौ. सविता अनंता वनगा यांनी ‘आपली नगरसेविका आपल्या दारी’ हे अभियान सुरू केले आहे. प्रभागातील प्रत्येक घरापर्यंत पोहोचून नागरिकांशी थेट संवाद साधणे आणि त्यांच्या समस्या जाणून घेऊन त्यावर तातडीने उपाययोजना करण्यासाठी प्रयत्न करणे, हा या अभियानाचा मुख्य उद्देश आहे.

भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते बाबाजी काठोळे, पालघर लोकसभा मतदारसंघाचे खासदार डॉ. हेमंत सवरा, जिल्हा उपाध्यक्ष संदीप पवार, महिला आघाडीच्या निशा सवरा, वाडा नगरपंचायतीच्या नगराध्यक्षा रीमा गंधे, वाडा शहर मंडळ अध्यक्ष स्वप्निल रोठे तसेच प्रभाग क्रमांक ११ चे बूथप्रमुख यांच्या मार्गदर्शनाखाली हे अभियान राबविण्यात येत आहे.

या अभियानाच्या माध्यमातून नागरिकांना आपल्या समस्या मांडण्यासाठी नगरपंचायतीत जाण्याची गरज भासणार नाही. नगरसेविका स्वतः नागरिकांच्या घरी भेट देऊन त्यांच्या अडचणी, परिसरातील प्रश्न आणि विकासकामांबाबतच्या सूचना जाणून घेणार आहेत. नागरिकांनी आपल्या समस्या व सूचना थेट आपल्यापर्यंत पोहोचवाव्यात, असे आवाहन नगरसेविका सौ. सविता अनंता वनगा यांनी केले आहे.

नागरिकांच्या प्रश्नांचे निराकरण करण्यासाठी संबंधित यंत्रणांकडे पाठपुरावा करून आवश्यक उपाययोजना करण्याचा प्रयत्न राहील. नागरिकांशी थेट संपर्क साधून त्यांच्या अडचणी समजून घेणे आणि प्रभागाच्या विकासाला चालना देणे, या उद्देशाने हे अभियान राबविण्यात येत असल्याने नागरिकांना आपल्या समस्या मांडण्यासाठी एक प्रभावी माध्यम उपलब्ध होणार आहे.
Weather
Stock Market
Live Cricket
LIVE
वाडा प्रभाग क्रमांक ११ मध्ये ‘आपली नगरसेविका आपल्या दारी’ अभियान नगरसेविका सौ. सविता वनगा नागरिकांच्या समस्या जाणून घेणार | सारसून येथे आठवडी बाजार समितीचा भव्य आठवडी बाजार | भडगावात लहान मुलाच्या अपहरणाचा डाव फसला; टू व्हीलर वर आले होते दोन संशयित पालकांना सतर्कतेचे आवाहन | ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांचे निधन; वयाच्या ७५व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास | सिद्धी सूर्यवंशीची राज्य अजिंक्यपद कबड्डी निवड चाचणीसाठी निवड | तासगाव तालुक्यात ‘सेवा सेतू’चे भव्य शिबिर; निमणी येथे गुरुवारी आयोजन : तहसीलदार अतुल पाटोळे. | तासगाव तालुक्यात ‘सेवा सेतू’चे भव्य शिबिर; निमणी येथे गुरुवारी आयोजन : तहसीलदार अतुल पाटोळे. | सांगली एलसीबीची विशेष मोहीम; पारधी समाजातील १४ पाहिजे, फरारी आरोपी पोलिसांसमोर हजर. | वडजी येथील तलाठी सौ. वैशाली वाघ यांच्यावर निलंबनाची टांगती तलवार; ८ दिवसांत कारवाई न झाल्यास भडगाव तहसीलवर शेतकऱ्यांचा ठिय्या आंदोलनाचा इशारा | महाराष्ट्र चे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे हे शेतकऱ्यांच्या बांधावर |