सारसून येथे आठवडी बाजार समितीचा भव्य आठवडी बाजार

👤 जितेंद्र मोरघा | 📅 10 October 2026 | 👁 7 Views
सारसून येथे आठवडी बाजार समितीचा भव्य आठवडी बाजार
सारसून येथे आठवडी बाजार समितीचा भव्य आठवडी बाजार

प्रतिनिधी – जितेंद्र मोरघा

सारसून ग्रामपंचायतीच्या पुढाकाराने मगरध्वज आठवडी बाजार समितीच्या माध्यमातून सारसून येथे मोठ्या स्वरूपात आठवडी बाजार सुरू करण्यात आला. ६ ऑक्टोबरपासून दर मंगळवारी हा आठवडी बाजार भरणार असल्याची माहिती बॅनरद्वारे देण्यात आली आहे.या आठवडी बाजारात नागरिकांना विविध प्रकारच्या वस्तू एकाच ठिकाणी उपलब्ध होणार आहेत. बाजाराचे प्रमुख आकर्षण म्हणून ताजी मच्छी व मावरा थेट खवलेवाडा येथील व्यापाऱ्यांकडून, तसेच शेतातून थेट आणलेला ताजा भाजीपाला उपलब्ध होणार आहे. त्यामुळे परिसरातील नागरिकांना ताजा भाजीपाला व मच्छी खरेदी करण्यासाठी नागरिकांना सोयीस्कर होणार आहे.
याशिवाय बाजारात किराणा, कपडे, कटलरी तसेच दैनंदिन जीवनासाठी आवश्यक असलेल्या विविध वस्तू एकाच ठिकाणी उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. त्यामुळे सारसून व परिसरातील नागरिकांसाठी हा आठवडी बाजार खरेदीच्या दृष्टीने सोयीचा ठरणार आहे.
स्थानिक नागरिकांना ताज्या व आवश्यक वस्तू सहज उपलब्ध व्हाव्यात, तसेच स्थानिक व्यापारी व शेतकऱ्यांना व्यवसायाची संधी मिळावी, या उद्देशाने हा आठवडी बाजार अधिक मोठ्या स्वरूपात सुरू करण्यात येत असल्याचे बॅनरवरून स्पष्ट होते.
Weather
Stock Market
Live Cricket
LIVE
सारसून येथे आठवडी बाजार समितीचा भव्य आठवडी बाजार | भडगावात लहान मुलाच्या अपहरणाचा डाव फसला; टू व्हीलर वर आले होते दोन संशयित पालकांना सतर्कतेचे आवाहन | ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांचे निधन; वयाच्या ७५व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास | सिद्धी सूर्यवंशीची राज्य अजिंक्यपद कबड्डी निवड चाचणीसाठी निवड | तासगाव तालुक्यात ‘सेवा सेतू’चे भव्य शिबिर; निमणी येथे गुरुवारी आयोजन : तहसीलदार अतुल पाटोळे. | तासगाव तालुक्यात ‘सेवा सेतू’चे भव्य शिबिर; निमणी येथे गुरुवारी आयोजन : तहसीलदार अतुल पाटोळे. | सांगली एलसीबीची विशेष मोहीम; पारधी समाजातील १४ पाहिजे, फरारी आरोपी पोलिसांसमोर हजर. | वडजी येथील तलाठी सौ. वैशाली वाघ यांच्यावर निलंबनाची टांगती तलवार; ८ दिवसांत कारवाई न झाल्यास भडगाव तहसीलवर शेतकऱ्यांचा ठिय्या आंदोलनाचा इशारा | महाराष्ट्र चे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे हे शेतकऱ्यांच्या बांधावर | ट्रॅक्टर अपघातात तरुणाचा जागीच मृत्यू एडगाव-आंबेडी येथील दुर्घटना ; तालुक्यात हळहळ... |