*खासगी पंटरमार्फत २० हजारांची लाच मागितल्याप्रकरणी भुसावळचे पोलिस हवालदार निलंबित*

👤 शुभम सुराणा | 📅 02 October 2026 | 👁 15 Views
*खासगी पंटरमार्फत २० हजारांची लाच मागितल्याप्रकरणी भुसावळचे पोलिस हवालदार निलंबित*
जळगाव प्रतिनिधी :- गुन्ह्यातील आरोपीला अटक न करण्याच्या मोबदल्यात एका खासगी पंटरमार्फत २० हजार रुपयांची लाच मागितल्याप्रकरणी भुसावळ तालुका पोलिस ठाण्यातील हवालदार महेश एकनाथ चौधरी यांना तडकाफडकी निलंबित करण्यात आले आहे. जिल्हा पोलिस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांनी ३० सप्टेंबर रोजी निलंबनाचे हे आदेश काढले.

डिजिटल रेकॉर्डरमुळे गुपित उघड:

भुसावळ तालुका पोलिस ठाण्यात दाखल असलेल्या एका गुन्ह्यात आरोपीला अटक टाळण्यासाठी हवालदार महेश चौधरी यांच्या सांगण्यावरून त्यांच्या खासगी पंटरने तक्रारदाराकडे २० हजार रुपयांची लाच मागितली होती. लाचेची रक्कम प्रत्यक्ष स्वीकारली नसली, तरी ३ ऑगस्ट रोजी करण्यात आलेल्या लाच मागणी पडताळणी दरम्यान डिजिटल व्हाईस रेकॉर्डरमध्ये त्यांचे संभाषण रेकॉर्ड झाले. यावरून खासगी पंटरविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

बेजबाबदार वर्तनावर ठपका:

पोलिस खात्यात कार्यरत असताना हवालदार महेश चौधरी यांचे हे वर्तन अत्यंत बेजबाबदारपणाचे आणि बेशिस्तपणाचे असल्याचा ठपका ठेवत जिल्हा पोलिस अधीक्षकांनी त्यांच्यावर निलंबनाची कठोर कारवाई केली आहे.
Weather
Stock Market
Live Cricket
LIVE
*खासगी पंटरमार्फत २० हजारांची लाच मागितल्याप्रकरणी भुसावळचे पोलिस हवालदार निलंबित* | *कॉफी शॉपच्या नावाखाली अश्लील चाळे; जळगावच्या 'हेवन कॅफे' मालकाविरुद्ध गुन्हा दाखल* | *दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना तातडीने मदत द्या व गिरणा नदी पात्रावरील अवैध्य वाळूचा उपसा थांबवा या मागणीसाठी भाजपा किसान मोर्चा* *चे जिल्हाधिकारी यांना निवेदन* | चोरीस गेलेले १२७ ग्रॅम सोन्याचे दागिने हस्तगत; तासगाव पोलिसांची कारवाई १२७.१८ ग्रॅम सोन्याचे दागिने न्यायालयाच्या आदेशाने हक्कदाराच्या स्वाधीन | भूजल पातळी खालावली, शेतकऱ्यांची चिंता वाढली; रोहित पाटलांची मुख्यमंत्र्यांकडे दुष्काळसदृश स्थिती जाहीर करण्याची मागणी | ट्रक अडवून नऊ लाखांचा दरोडा; उमदी पोलिसांकडून चौघांना अटक : १७ लाख ४३ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल जप्त | काळाचा घाला! पिकअपला दुचाकीची धडक; वडिलांसह सहा वर्षांच्या चिमुकलीचा दुर्दैवी अंत आई गंभीर जखमी; | कॅप्सूलमधून एमडीची तस्करी; ९६५ ग्रॅम ड्रग्जसह एक जेरबंद सांगली एलसीबीची विट्यात कारवाई; ४२.८२ लाखांचा मुद्देमाल जप्त. | उरुण- ईश्वरपुर मध्ये MPSC विद्यार्थ्यांचा भव्य मोर्चा | मतदार यादी पुनरीक्षणाची प्रक्रिया निष्पक्ष, पारदर्शक व सर्वसमावेशक राबवावी- मतदार यादी निरीक्षक शीतल तेली-उगले |