*कॉफी शॉपच्या नावाखाली अश्लील चाळे; जळगावच्या 'हेवन कॅफे' मालकाविरुद्ध गुन्हा दाखल*

👤 शुभम सुराणा | 📅 02 October 2026 | 👁 3 Views
*कॉफी शॉपच्या नावाखाली अश्लील चाळे; जळगावच्या 'हेवन कॅफे' मालकाविरुद्ध गुन्हा दाखल*
शहरातील एका नामांकित महाविद्यालय परिसरामध्ये कॉफी शॉपच्या नावाखाली तरुण-तरुणींना अश्लील चाळ्यांसाठी जागा उपलब्ध करून देणाऱ्या 'हेवन कॅफे'वर रामानंद नगर पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. याप्रकरणी कॅफे मालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

दामिनी पथकाची धाडसी कारवाई:

पोलिस पेट्रोलिंग करत असताना दामिनी पथकाला गुप्त माहिती मिळाली की, college परिसरातील 'हेवन कॅफे'मध्ये महाविद्यालयीन मुले-मुलींना अश्लील चाळे करण्यासाठी स्वतंत्र जागा उपलब्ध करून दिली जात आहे. या माहितीच्या आधारे रामानंद नगर पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक मधुकर साळवे यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक सचिन रणशेवरे, जितेंद्र राजपूत आणि दामिनी पथकातील महिला पोलिसांनी कॅफेवर थेट छापा टाकला.

कॅफेमध्ये कॉफीच नव्हती!

पोलिसांनी छापा टाकला तेव्हा कॅफेमधील कंपार्टमेंटमध्ये काही जण अश्लील चाळे करताना रंगेहाथ आढळले. पोलिसांनी तेथे उपस्थित तरुण-तरुणींना तोंडी समज देऊन सोडून दिले. धक्कादायक बाब म्हणजे, तपासणी दरम्यान या ठिकाणी कॉफी शॉपचा कुठलाही अधिकृत परवाना नव्हता, तसेच कॅफेमध्ये कॉफी बनवण्याचे साहित्य किंवा कोणतेही खाद्यपदार्थ आढळून आले नाहीत. केवळ अश्लील चाळ्यांसाठीच हे केंद्र चालवले जात असल्याचे उघड झाले.

मालकावर गुन्हा दाखल:

याप्रकरणी कॅफे मालक विजय राजेंद्र पाटील (वय २९, रा. खेडी, ता. जळगाव) याच्याविरुद्ध रामानंद नगर पोलिस ठाण्यात रीतसर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
Weather
Stock Market
Live Cricket
LIVE
*खासगी पंटरमार्फत २० हजारांची लाच मागितल्याप्रकरणी भुसावळचे पोलिस हवालदार निलंबित* | *कॉफी शॉपच्या नावाखाली अश्लील चाळे; जळगावच्या 'हेवन कॅफे' मालकाविरुद्ध गुन्हा दाखल* | *दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना तातडीने मदत द्या व गिरणा नदी पात्रावरील अवैध्य वाळूचा उपसा थांबवा या मागणीसाठी भाजपा किसान मोर्चा* *चे जिल्हाधिकारी यांना निवेदन* | चोरीस गेलेले १२७ ग्रॅम सोन्याचे दागिने हस्तगत; तासगाव पोलिसांची कारवाई १२७.१८ ग्रॅम सोन्याचे दागिने न्यायालयाच्या आदेशाने हक्कदाराच्या स्वाधीन | भूजल पातळी खालावली, शेतकऱ्यांची चिंता वाढली; रोहित पाटलांची मुख्यमंत्र्यांकडे दुष्काळसदृश स्थिती जाहीर करण्याची मागणी | ट्रक अडवून नऊ लाखांचा दरोडा; उमदी पोलिसांकडून चौघांना अटक : १७ लाख ४३ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल जप्त | काळाचा घाला! पिकअपला दुचाकीची धडक; वडिलांसह सहा वर्षांच्या चिमुकलीचा दुर्दैवी अंत आई गंभीर जखमी; | कॅप्सूलमधून एमडीची तस्करी; ९६५ ग्रॅम ड्रग्जसह एक जेरबंद सांगली एलसीबीची विट्यात कारवाई; ४२.८२ लाखांचा मुद्देमाल जप्त. | उरुण- ईश्वरपुर मध्ये MPSC विद्यार्थ्यांचा भव्य मोर्चा | मतदार यादी पुनरीक्षणाची प्रक्रिया निष्पक्ष, पारदर्शक व सर्वसमावेशक राबवावी- मतदार यादी निरीक्षक शीतल तेली-उगले |