चोरीस गेलेले १२७ ग्रॅम सोन्याचे दागिने हस्तगत; तासगाव पोलिसांची कारवाई १२७.१८ ग्रॅम सोन्याचे दागिने न्यायालयाच्या आदेशाने हक्कदाराच्या स्वाधीन

👤 संतोष एडके तासगाव | 📅 18 September 2026 | 👁 85 Views
चोरीस गेलेले १२७ ग्रॅम सोन्याचे दागिने हस्तगत; तासगाव पोलिसांची कारवाई १२७.१८ ग्रॅम सोन्याचे दागिने न्यायालयाच्या आदेशाने हक्कदाराच्या स्वाधीन

दैनिक आखुर / संतोष एडके, तासगाव
तासगाव : तासगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडलेल्या चोरीच्या गुन्ह्याचा छडा लावत पोलिसांनी सुमारे ४ लाख ८० हजार रुपये किमतीचे १२७.१८ ग्रॅम सोन्याचे दागिने हस्तगत केले. न्यायालयाच्या आदेशानुसार हे दागिने संबंधित हक्कदार फिर्यादीला परत करण्यात आले. पोलिसांच्या या कारवाईमुळे फिर्यादीला मोठा दिलासा मिळाला आहे.
तासगाव पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर क्रमांक ३४०/२०२६, भारतीय न्याय संहितेच्या कलम ३३१(३), ३०५(अ) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता. शिरगाव (ता. तासगाव) येथील मूर्ती गोविंदराव पाटील (वय ३६) यांच्या तक्रारीवरून पोलिसांनी तपासाची चक्रे गतिमान केली.
तपास पथकाकडून गुन्ह्याचा छडा
सांगली जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक तुषार दोशी, अपर पोलीस अधीक्षक कल्पना बारवकर आणि उपविभागीय पोलीस अधिकारी किरण अवचर यांच्या मार्गदर्शनाखाली तासगाव पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक विशाल टकले यांनी तपास पथकाची नियुक्ती केली.
या पथकात सपोनि दीपक पाटील, पोहेकॉ अमर सूर्यवंशी, पोहेकॉ सुरेश भोसले, पोशी विवेक यादव, पोशी सुरज जगदाळे, पोशी निलेश डांगे, पोशी संतोष माळी, पोशी योगेश जाधव, पोशी शहाजी भोसले आणि पोशी सागर पाटील यांचा समावेश होता.
पथकाने गुन्ह्याचा तपास करत संशयित आरोपीकडून चोरीस गेलेले सोन्याचे दागिने हस्तगत केले. यामध्ये नेकलेस, बांगड्या, कर्णफुले, मंगळसूत्र, बोरमाळ, गळ्यातील दागिना आणि अंगठी अशा विविध दागिन्यांचा समावेश असून, त्यांची एकूण किंमत सुमारे ४ लाख ८० हजार रुपये आहे.
न्यायालयाच्या आदेशाने दागिने फिर्यादीला परत
तपासादरम्यान हस्तगत करण्यात आलेले १२७.१८ ग्रॅम सोन्याचे दागिने प्रथमवर्ग न्याय दंडाधिकारी, तासगाव यांच्या आदेशानुसार संबंधित हक्कदार फिर्यादीला परत करण्यात आले. उपविभागीय पोलीस अधिकारी किरण अवचर यांच्या हस्ते दागिने फिर्यादीकडे सुपूर्द करण्यात आले.
चोरीस गेलेला मौल्यवान मुद्देमाल परत मिळाल्याने फिर्यादीला दिलासा मिळाला असून, गुन्ह्याचा तपास करून मुद्देमाल हस्तगत करणाऱ्या तासगाव पोलिसांच्या तपास पथकाचे कौतुक होत आहे.
Weather
Stock Market
Live Cricket
LIVE
चोरीस गेलेले १२७ ग्रॅम सोन्याचे दागिने हस्तगत; तासगाव पोलिसांची कारवाई १२७.१८ ग्रॅम सोन्याचे दागिने न्यायालयाच्या आदेशाने हक्कदाराच्या स्वाधीन | भूजल पातळी खालावली, शेतकऱ्यांची चिंता वाढली; रोहित पाटलांची मुख्यमंत्र्यांकडे दुष्काळसदृश स्थिती जाहीर करण्याची मागणी | ट्रक अडवून नऊ लाखांचा दरोडा; उमदी पोलिसांकडून चौघांना अटक : १७ लाख ४३ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल जप्त | काळाचा घाला! पिकअपला दुचाकीची धडक; वडिलांसह सहा वर्षांच्या चिमुकलीचा दुर्दैवी अंत आई गंभीर जखमी; | कॅप्सूलमधून एमडीची तस्करी; ९६५ ग्रॅम ड्रग्जसह एक जेरबंद सांगली एलसीबीची विट्यात कारवाई; ४२.८२ लाखांचा मुद्देमाल जप्त. | उरुण- ईश्वरपुर मध्ये MPSC विद्यार्थ्यांचा भव्य मोर्चा | मतदार यादी पुनरीक्षणाची प्रक्रिया निष्पक्ष, पारदर्शक व सर्वसमावेशक राबवावी- मतदार यादी निरीक्षक शीतल तेली-उगले | जतच्या पवनचक्क्यांमधील तारचोरीचा पर्दाफाश; एकाला अटक १४.७४ लाखांचा मुद्देमाल जप्त; सात चोरीचे गुन्हे उघडकीस | एसटी आरक्षणापासून नामकरणापर्यंत; विविध मागण्यांसाठी तासगावात धनगर समाज एकवटला : तासगाव तहसीलदारांना निवेदन; वीर शिंग्रोबा, अहिल्यादेवी होळकर यांच्या नावासह देवस्थानांच्या कारभारात पारदर्शकतेची मागणी | चोरीचे सोने विक्रीला आला अन् सांगली एलसीबी पोलिसांच्या जाळ्यात अडकला ४२ ग्रॅम सोन्याचे दागिने हस्तगत; ६ लाख ३० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त |