कुंभवडे येथे श्री . राजन पाटील आयुर्वेदिक हॉस्पिटल व ए . एस . पी . एम मेडीकल कॉलेज सांगुळवाडी यांचे आरोग्य शिबिर संपन्न . . .
वैभववाडी ( प्रतिनिधी)
कुंभवडे येथे आज आयुर्वेदिक हॉस्पिटल व ए . एस . पी . एम मेडीकल कॉलेज सांगुळवाडी यांचे आरोग्य शिबिर संपन्न झाले या आरोग्य शिबिरात विविध आजारांवर तपासण्या करण्यात आल्या शिबिरात महिलांसाठी खास श्री . राजन पाटील आयुर्वेदीक हॉस्पिटलच्या स्त्रिरोग तज्ञ डॉ. ऋतुजा म्हसे मॅडम उपस्थित होत्या त्यांनी महिलांना योग्य मार्गदर्शनही केले व आयुर्वेदाचे महत्व समजावून सांगीतले तसेच डॉ. शिवाली राणे , डॉ. अनिरुद्ध मुद्राळे ही उपस्थित होते . कुंभवडे गावचे सरपंच विनोद कदम तसेच कुंभवडे गावचे ग्रामसेवक ही उपस्थित होते .