श्रावणी दुसऱ्या सोमवारी कुणकेश्वर मंदिरात भाविकांची अलोट गर्दी; ‘हर हर महादेव’च्या जयघोषाने परिसर दुमदुमला

👤 तुषार शिंगाडे | 📅 24 August 2026 | 👁 13 Views
श्रावणी दुसऱ्या सोमवारी कुणकेश्वर मंदिरात भाविकांची अलोट गर्दी; ‘हर हर महादेव’च्या जयघोषाने परिसर दुमदुमला
श्रावणी दुसऱ्या सोमवारी कुणकेश्वर मंदिरात भाविकांची अलोट गर्दी; ‘हर हर महादेव’च्या जयघोषाने परिसर दुमदुमला
कुणकेश्वर (प्रतिनिधी) : देवगड तालुक्यातील श्री क्षेत्र कुणकेश्वर येथे श्रावणातील दुसऱ्या सोमवारी भगवान श्री कुणकेश्वराच्या दर्शनासाठी पहाटे ५ वाजल्यापासूनच भाविकांच्या रांगा लागल्या. दिवसभर विविध धार्मिक कार्यक्रमांमुळे मंदिर परिसर भक्तिमय वातावरणाने गजबजून गेला.
या दिवशी प्रथम पूजेचा मान माजी आमदार वैभव नाईक, कणकवली उपनगराध्यक्ष सुशांत नाईक, उद्योजक अतुल रावराणे, उद्योजक संजय आंग्रे तसेच शिवभक्त व समाजसेवक संजय बावधनकर (राजापूर) यांना देण्यात आला. यावेळी देवस्थान ट्रस्टच्या वतीने मान्यवरांचा मानसन्मान करण्यात आला.
यावेळी देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष एकनाथ तेली, उपाध्यक्ष गणेश वाळके, सचिव हेमंत वातकर, खजिनदार उदय पेडणेकर यांच्यासह ट्रस्टचे सर्व सदस्य उपस्थित होते. तसेच देवगड पंचायत समितीचे उपसभापती अमोल लोके यांचीही उपस्थिती होती.
दरवर्षीप्रमाणे यंदाही राजापूर मित्र मंडळाच्या वतीने संजय बावधनकर यांच्या सहकार्याने आयोजित पदयात्रा कुणकेश्वर येथे दाखल झाली. या पदयात्रेत सुमारे २०० शिवभक्त सहभागी झाले.
दरम्यान, सकाळी ७ ते रात्री ८ वाजेपर्यंत कोकण व मुंबई प्रांतातील प्रसिद्ध भजनी मंडळांचे भजनाचे कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत. यामध्ये भजनी बुवा श्रीधर मुणगेकर, भगवान लोकरे, रामदास कासले, प्रमोद हर्याण तसेच रायगड येथील बुवा महादेव शहाबाजकर यांच्यासह विविध भजनी मंडळींची सेवा लाभणार आहे.
श्रावणातील प्रत्येक सोमवारी भाविकांसाठी साबुदाणा खिचडी व शेंगदाणा उसळीचा प्रसाद वाटप करण्यात येत आहे. यासाठी विठ्ठल फणसेकर, भाई नरे, दीपक हिर्लेकर, गोपाळ वाळके यांच्यासह दानशूर देणगीदारांचे सहकार्य देवस्थान ट्रस्टला लाभले आहे.
भाविकांची वाढती गर्दी लक्षात घेता देवस्थान ट्रस्टच्या वतीने दर्शन व्यवस्था, प्रसाद वाटप तसेच इतर आवश्यक सोयी-सुविधांचे नियोजन करण्यात आले आहे. श्रावणी सोमवारनिमित्त दिवसभर कुणकेश्वर मंदिर परिसरात ‘हर हर महादेव’च्या जयघोषाने भक्तिमय वातावरण निर्माण झाले होते.
Weather
Stock Market
Live Cricket
LIVE
आरवडे गावाच्या नामांतराला ग्रामस्थांचा जोरदार विरोध; 'गोपाळपूर' नाव बदल रद्द करण्याची मागणी | सांगलीत पोलीस मुख्यालयाच्या मैदानावर किल्ला भिंतीचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते लोकार्पण | कुंभवडे येथे श्री . राजन पाटील आयुर्वेदिक हॉस्पिटल व ए . एस . पी . एम मेडीकल कॉलेज सांगुळवाडी यांचे आरोग्य शिबिर संपन्न . . . | इनामदार श्री देव रामेश्वर संस्थान आयोजित रक्तदान शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद | श्रावणी दुसऱ्या सोमवारी कुणकेश्वर मंदिरात भाविकांची अलोट गर्दी; ‘हर हर महादेव’च्या जयघोषाने परिसर दुमदुमला | केसरेकर दाम्पत्याच्या मुलांचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी घेतले शैक्षणिक पालकत्व मुलांची भेट घेऊन केले सांत्वन; शिक्षण व वसतिगृहाचा खर्च करण्याची घेतली जबाबदारी | एकजुटीने नशामुक्तीचा निर्धार करूया; अमली पदार्थमुक्त सांगली जिल्हा करूया : पालकमंत्री चंद्रकांत पाटील नशामुक्ती निर्धार पदयात्रेला सांगलीकरांचा उत्स्फूर्त प्रतिसाद; ‘नशामुक्त सांगली, सुरक्षित सांगली’चा सामूहिक संकल्प | आचरा तिठ्यावर २५ ऑगस्टला नारळ लढविण्याची रंगत; महिलांसाठी स्वतंत्र स्पर्धेचे आयोजन | उद्या सांगलीमध्ये नशामुक्त अभियान, जिल्हाधिकारी मैनाक घोष | तासगाव अंनिस शाखेतर्फे वैज्ञानिक दृष्टिकोन दिन साजरा; दाभोलकर हत्येतील सूत्रधारांना शिक्षा करण्याची मागणी |