आचरा तिठ्यावर २५ ऑगस्टला नारळ लढविण्याची रंगत; महिलांसाठी स्वतंत्र स्पर्धेचे आयोजन
👤 तुषार शिंगाडे |
📅
23 August 2026 |
👁 9 Views
आचरा (प्रतिनिधी) : शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षातर्फे पुरस्कृत नारळ लढविणे स्पर्धा मंगळवार, दि. २५ ऑगस्ट रोजी दुपारी २ वाजता आचरा तिठा येथे आयोजित करण्यात आली आहे. यंदा या स्पर्धेचे पाचवे वर्ष असून, प्रथमच महिलांसाठी स्वतंत्र नारळ लढविणे स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.
मुख्य स्पर्धेत प्रथम येणाऱ्या १२८ स्पर्धकांना प्राधान्य देण्यात येणार आहे. विजेत्यास ५,००१ रुपये व चषक, तर उपविजेत्यास ३,००१ रुपये व चषक देण्यात येणार आहे. प्रथम क्रमांकाचा चषक मंदार ओरसकर, नगरसेवक यांच्यातर्फे पुरस्कृत करण्यात आला आहे. स्पर्धेची प्रवेश फी २५० रुपये आहे.
महिलांसाठी स्वतंत्र स्पर्धा
यंदाच्या स्पर्धेचे विशेष आकर्षण म्हणजे आचरा विभागातील महिलांसाठी स्वतंत्र नारळ लढविणे स्पर्धा. महिला विभागातील विजेत्या स्पर्धकास पैठणी, तर द्वितीय क्रमांकाच्या विजेतीस भेटवस्तू देण्यात येणार आहे. पैठणीचे प्रायोजक गजानन गावकर आहेत. महिला विभागात प्रथम ३२ स्पर्धकांना प्राधान्य देण्यात येणार असून, महिलांसाठी स्पर्धेतील नारळ मोफत उपलब्ध करून देण्यात येतील.
या दोन्ही स्पर्धांमध्ये जास्तीत जास्त स्पर्धकांनी सहभागी व्हावे, असे आवाहन आयोजकांनी केले आहे. नाव नोंदणीसाठी रुपम टेमकर ९१६८१०७०१००, विद्यानंद परब ९४२११४४३७६ आणि माणिक राणे ९४२१२३७८१० या क्रमांकांवर संपर्क साधावा.