तासगाव अंनिस शाखेतर्फे वैज्ञानिक दृष्टिकोन दिन साजरा; दाभोलकर हत्येतील सूत्रधारांना शिक्षा करण्याची मागणी

👤 संतोष एडके तासगाव | 📅 21 August 2026 | 👁 6 Views
तासगाव अंनिस शाखेतर्फे वैज्ञानिक दृष्टिकोन दिन साजरा; दाभोलकर हत्येतील सूत्रधारांना शिक्षा करण्याची मागणी


तासगाव : महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या (अंनिस) तासगाव शाखेतर्फे डॉ. नरेंद्र दाभोलकर यांचा तेरावा स्मृतिदिन ‘वैज्ञानिक दृष्टिकोन दिन’ दिनांक २०ऑगस्ट रोजी विविध उपक्रमांनी साजरा करण्यात आला.
खंडोबाची वाडी, चिंचणी, आरवडे, मणेराजुरी आणि कवठेएकंद येथील माध्यमिक शाळांमध्ये ‘वैज्ञानिक दृष्टिकोन म्हणजे काय?’ या विषयावर व्याख्याने घेण्यात आली. तसेच विद्यार्थ्यांसमोर विविध चमत्कारांचे वैज्ञानिक स्पष्टीकरण देणारे प्रात्यक्षिक सादर करण्यात आले.
या उपक्रमात माजी प्राचार्य मस्के, एच. बी. पाटील, प्रा. वासुदेव गुरव, राज्य कार्यकारिणी सदस्या सुजाता म्हेत्रे, नूतन परिट, जिल्हा कार्याध्यक्ष अमर खोत आणि तालुका सचिव प्रा. संजय वावरे सहभागी झाले. संस्थामाता सुशिलादेवी साळुंखे महिला शिक्षणशास्त्र महाविद्यालयाचे प्राचार्य, शिक्षक व विद्यार्थिनींचे विशेष सहकार्य लाभले.
दरम्यान, डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्येच्या मागील मुख्य सूत्रधारांना शोधून त्यांना शिक्षा करण्यात यावी, या मागणीचे निवेदन तासगाव अंनिसच्या वतीने तहसीलदार, तासगाव यांना देण्यात आले. यावेळी जिल्हा कार्याध्यक्ष अमर खोत, भरत थोरात, रवी जाधव, प्रा. वासुदेव गुरव यांच्यासह अंनिसचे कार्यकर्ते उपस्थित होते.
Weather
Stock Market
Live Cricket
LIVE
तासगाव अंनिस शाखेतर्फे वैज्ञानिक दृष्टिकोन दिन साजरा; दाभोलकर हत्येतील सूत्रधारांना शिक्षा करण्याची मागणी | शक्तीपीठविरोधात सांगलीत शेतकऱ्यांचा महासंग्राम; नेत्यांची एकजूट, सरकारविरोधात रणशिंग | कुपवाड दुहेरी हत्याकांडाचा निषेध ; सांगली बंद मोर्चातून आरोपीला फाशीची मागणी | कोळपे मतदारसंघातील साकवांच्या कामांना मंजुरी देऊन निधी द्या; जि.प. सदस्य प्रमोद रावराणे यांची पालकमंत्र्यांकडे मागणी | देवगड आनंदवाडी बंदर विकासासाठी ८५ कोटी मंजूर पुढील १८ महिन्यांत सुरक्षित व सुसज्ज बंदर विकसित करणार; मच्छीमारांच्या विकासासह जिल्ह्याचे दरडोई उत्पन्न वाढण्याचे सामर्थ्य – मत्स्य व्यवसाय मंत्री नितेश राणे | भाजप ओबीसी मोर्चाच्या जिल्हा सरचिटणीसपदी प्रकाश मेस्त्री...!* | सेवा अभियानातून जनतेशी थेट संवाद’; अलिबागमध्ये आमदार प्रमोद जठार, संतोष साखरे यांनी स्वीकारली नागरिकांची निवेदने | छात्रों की गूंज’ला सिंधुदुर्गातून बुलंद पाठिंबा; कणकवलीत काँग्रेसचे शक्तिप्रदर्शन युवक काँग्रेस जिल्हाध्यक्ष किरण टेंबुलकर यांची माहिती | देवगडमध्ये यंदापासून बी.एस्सी. नर्सिंग महाविद्यालय सुरू ग्रामीण विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणाची नवी संधी; आमदार प्रमोदजी जठार यांच्या प्रयत्नांना यश | मिरज-पंढरपूर महामार्गावर ३०० किलो गांजा जप्त; १ कोटी ७५ लाखांचा मुद्देमाल हस्तगत |